Khadi Gramodyog  Agrowon
ॲग्रो विशेष

Khadi Gramodyog : खादी ग्रामोद्योगामुळे साडेनऊ लाख नवीन नोकऱ्या

Job Update : खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार यांनी दिली.

Team Agrowon

Nashik News : खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार यांनी दिली. नवीन खादीने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नवी दिशा दिली असून,

गेल्या नऊ वर्षांत खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीने वाढ झाल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्याचे, तसेच भारत तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाचा सिहांचा वाटा असेल, असेही त्यांनी सांगितले.

खादी ग्रामोद्योग आयोग नाशिक केंद्रातर्फे कार्यक्रमांचे आयोजन सातपूर येथे केले होते. या वेळी ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो लाभार्थ्यांना मधुमक्षिकापालन पेटी प्रशिक्षण, महिलांना विद्युत टूल कीट, स्वयंचलित पेपर प्लेट बनविण्याची मशिन, तसेच विद्युतचलित चाकाचे वाटप अध्यक्ष मनोजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय उपकार्य अधिकारी पी. नलमुतू, संचालक योगेश भांबरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, डहाणू केंद्राचे प्राचार्य किरण उईके, संदीप कोते, सहायक निदेशक सुनील वीर यांच्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

या वेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय उपकार्य अधिकारी पी. नलमुतू, संचालक योगेश भांबरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, डहाणू केंद्राचे प्राचार्य किरण उईके, संदीप कोते, सहायक निदेशक सुनील वीर यांच्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मनोजकुमार यांनी सांगितले, की ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मंत्रामुळे खादीला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली आहे. ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत आतापर्यंत २७ हजारांहून अधिक कुंभार समाजातील बंधू-भगिनींना विद्युत चलित चाकाचे वाटप केल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली आहे.

तर मध अभियान योजनेंतर्गत आतापर्यंत २० हजार लाभार्थ्यांना दोन लाखांहून अधिक मधमाशांच्या पेट्या आणि मधमाशांच्या वसाहतींचे वाटप केले आहे. सध्या देशभरात तीन हजारांहून अधिक खादी संस्था कार्यरत आहेत, ज्याद्वारे पाच लाखांहून अधिक खादी कारागीर आणि कामगारांना रोजगार मिळत आहे. महाराष्ट्रातील ३१ खादी संस्थांच्या माध्यमातून एक हजार ४०० हून अधिक कारागिरांना रोजगार मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात येथील ६० खादी आउटलेट्सवर २६ कोटींहून अधिक खादीची विक्री झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT