Kahdi Yatra : खादी ग्रामोद्योग मंडळ काढणार आता खादी यात्रा

Khadi Gramodyog : ग्रामीण भागातील कारागिरांकडून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून पुढाकार घेतला जाणार आहे.
Khadi Gramodyog
Khadi GramodyogAgrowon

Nagpur News : ‘‘ग्रामीण भागातील कारागिरांकडून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून पुढाकार घेतला जाणार आहे. त्या अंतर्गत चांदा ते बांदा अशी यात्रा काढून अशा उत्पादनांविषयी जागृती केली जाईल. खादी यात्रा असे याला नाव देण्याचे प्रस्तावित आहे,’’ अशी माहिती खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या श्री. साठे यांनी ‘ॲग्रोवन’बरोबर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘बारा बलुतेदार व्यवस्थेत ग्रामीण भागातील कारागिरांना संरक्षण होते. पुढे ही व्यवस्था मर्यादित झाली; मात्र आजही ग्रामीण भागात अनेक दर्जेदार वस्तूंचे उत्पादन होते.

खादी कापडालाही मागणी आहे. त्यात वाढ व्हावी, याकरिता खादी यात्रा काढण्यात येईल. राज्यात ग्रामोद्योग वसाहती उभारण्याचे काम देखील आमचे आहे. गेल्या अनेक वर्षांत हे काम झाले नाही. यापुढील काळात त्याला प्रोत्साहन दिले जाईल.’’

Khadi Gramodyog
Agriculture Technology : कोरडवाहू शेतीसाठी शून्य मशागत तंत्रज्ञान

‘‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्काराद्वारे याद्वारे छोट्या उद्योग, उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. राजभवनला हा पहिला पुरस्कार सोहळा झाला. ‘हर घर खादी, घर घर खादी’ या संकल्पनेवर देखील खादी महामंडळ काम करणार आहे. छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे यात अपेक्षित आहे. यात प्रशासकीय विभागस्तरावर खादी प्रदर्शनाचेही आयोजन होईल.

Khadi Gramodyog
Agriculture Department : प्रशासकीयदृष्ट्या झीरो पेंडन्सीमध्ये नाशिक विभाग अव्वलस्थानी

राज्यातील सहा विभागांत अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्याचे प्रस्तावित आहे. खादी प्रमोशनसाठी मुंबईतील तीन महाविद्यालयांनी सामंजस्य करार केले आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दर सोमवारी खादी घालावी, असा सरकारचे परिपत्रकाद्वारे निर्देश आहेत. आमच्या कार्यालयात आम्ही दर सोमवारी खादी वापरतो. यातून देखील खादीचा वापर वाढेल,’’ असे साठे म्हणाले.

ग्रामोद्योग संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले. खादी आणि ग्रामीण उद्योजकांकडून उत्पादित मधासोबतच इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यावर भर राहील. राज्यातील सगळ्या मधपाळांची नोंदणी प्रस्तावित आहे. त्यांना दिशा द्यावी, त्यांचा मध खरेदी करावा. गुणवत्ता तपासणी व्हावी, यावरही काम होईल.
- रवींद्र साठे, सभापती, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com