Bribe News  Agrowon
ॲग्रो विशेष

Arrest in Bribe : लाचप्रकरणात निफाडचा सहकार अधिकारी अटकेत

Bribe News : सावकारीचा अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी निफाडच्या सहकार अधिकाऱ्याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाखाची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

Team Agrowon

Nashik News : सावकारीचा अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी निफाडच्या सहकार अधिकाऱ्याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाखाची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु नंतर टाळाटाळ करू लागल्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सहकार अधिकाऱ्याला अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

निफाड येथील साहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील सहकार अधिकारी (श्रेणी-१) राजेश शंकर ढवळे (५३,रा.कृष्णा अपार्टमेंट, चेतनानगर,इंदिरानगर, नाशिक) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, सावकारीचा अहवाल सकारात्मक करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा,

यासाठी लाचखोर अधिकारी ढवळे याने तक्रारदाराकडे ६ सप्टेंबर २०२३ला दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’च्या पथकाने पडताळणी केली होती. त्यावेळी लाचखोर ढवळे याने पंचासमक्ष तडजोडीअंती लाचेची एक लाख रुपयाची लाच स्वीकारण्याची तयारीही दर्शविली होती.

दरम्यान, ढवळे सातत्याने टाळाटाळ करीत होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. ९) दुपारी लाचखोर ढवळे याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करीत ढवळे यास अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार, संतोष गांगुर्डे, मनोज पाटील यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI Wildlife Protection: ‘एआय’ देणार बिबट्याची चाहूल शेतकऱ्यांना मिळणार अलर्ट

PM Dhandhanya Krishi Yojana: ‘धनधान्य’चा कृती आराखडा सर्वसमावेशक करा

Manoj Jarange Patil: आंदोलन ताकदीनं लावून धरा, आम्ही आहोतच, सरकारचा डाव प्रतिडावानं उधळून टाका : मनोज जरांगे

Rain Crop Damage : बर्दापूरसह परिसरात मुसळधार पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्याशी संध्याकाळी ७ वाजता बैठक; बैठकीला कोण-कोण हजर राहणार?

SCROLL FOR NEXT