Secretary, Ministry of Energy Nidhi Khare Agrowon
ॲग्रो विशेष

Ministry of Non-Conventional Energy : केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी निधी खरे यांची नियुक्ती

Secretary, Ministry of Energy Nidhi Khare : केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी श्रीमती निधी खरे यांची नियुक्ती झाली आहे. देशाच्या कृषी व्यवस्थेत सौर आणि पवन ऊर्जा प्रणालीचा वापर वाढविण्याची जबाबदारी या मंत्रालयावर आहे.

मनोज कापडे

Pune News : केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी श्रीमती निधी खरे यांची नियुक्ती झाली आहे. देशाच्या कृषी व्यवस्थेत सौर आणि पवन ऊर्जा प्रणालीचा वापर वाढविण्याची जबाबदारी या मंत्रालयावर आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या १९९२ मधील तुकडीतील श्रीमती खरे या हुशार सनदी अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या त्या सध्या पूर्णवेळ सचिव आहेत. नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी दोन महिन्यांपूर्वीच प्रशांतकुमार सिंह यांची नियुक्ती झाली होती. देशाची अपारंपरिक ऊर्जा क्षमता सध्या २०० गिगावॉटच्या आसपास आहे.

ती पाच वर्षांत दुपटीहून अधिक म्हणजे ५०० गिगावॉटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट श्री. सिंह यांना देण्यात आले होते. तसेच २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य देण्याच्या भारतीय धोरणात या मंत्रालयाचा वाटा मोठा राहणार होता. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकरीता सौर ऊर्जेवर आधारित ‘कुसुम’ तसेच शहरवासीयांसाठी ‘सूर्यघर’ योजनेला पुढे नेण्याची जबाबदारीदेखील या मंत्रालयावर आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू असतानाच सचिव श्री. सिंह पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण ते सनदी अधिकाऱ्यांच्या मणिपूर तुकडीमधून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. मणिपूर राज्य सरकारने त्यांना मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिवपद रिक्त झाले.

श्रीमती खरे यांच्याकडे नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिवपद तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहे. मात्र कृषी क्षेत्राच्या संबंधित जैवऊर्जा धोरणाला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या या क्षेत्रातून ११ गिगावॉटहून अधिक ऊर्जा देशाला मिळत असून ती वाढविण्यासाठी केंद्राकडून विविध योजना आणल्या जात आहेत.

साखर उद्योगाच्या म्हणण्यानुसार, जैवऊर्जा धोरणाची जलद अंमलबजावणी करण्यासाठी योजनांचे नियम सुटसुटीत होण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची तसेच सचिव म्हणून श्रीमती खरे यांची भूमिका मोलाची राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT