Agriculture Management : शेती नियोजनात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...

Solar Energy : सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा ग्रीन हाऊस इफेक्‍टमुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी हे तापमान ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.
Agriculture Management
Agriculture ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुकेश्नी वाणे

सोलर टनेल ड्रायर -

Solar Tunnel Dryer : सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅण्डी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळविण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे. 

२५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे. 

- टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉंक्रीटचा बनविलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे. 

- अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे. 

- सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा ग्रीन हाऊस इफेक्‍टमुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी हे तापमान ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. 

- वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य, भाजीपाला, फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो. 

- ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे याद्वारे पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते. 

- ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात. 

Agriculture Management
Solar Kusum Scheme : महाऊर्जा संकेतस्थळ चालेना

वैशिष्ट्ये

- आवश्‍यकतेनुसार विविध आकारांची संरचना करता येते. 

- सोलर टनेल ड्रायर पूर्व-पश्‍चिम दिशेस बांधावा. 

- स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यातून तयार करता येतो. 

सोलर कॅबिनेट ड्रायर

- विविध रचनेचे सोलर ड्रायर बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण त्या ड्रायरचा वापर जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हाच करता येऊ शकतो, म्हणजेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत. परंतु पाचनंतर ड्रायरमध्ये पदार्थ वळविण्याचे काम थांबते. पदार्थ वळविण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर दिवसाकाठी फक्त आठ तास करता येतो.

सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा सायंकाळी पाच वाजता नंतर वापर करता यावा म्हणजेच शेतीमाल वाळविण्यासाठी अतिरिक्त अवधी निर्माण करता यावा हा उद्देश ठेवून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सोलर कॅबिनेट ड्रायरची निर्मिती करण्यात आली. या ड्रायरमध्ये उष्णता संग्रहक यंत्रणेचा समावेश केलेला आहे.

या ड्रायरमध्ये उष्णता संग्रहक यंत्रणेमुळे दिवसाकाठी मिळणाऱ्या सूर्याच्या किरणांनी सोलर एअर हिटर मधील थंडी हवा गरम केली जाते, त्याच वेळी गरम झालेली अॅल्युमिनियम शीट आणि खाली भरलेली गिट्टी व लोखंडी चुरा सुद्धा गरम होतो. गिट्टी आणि लोखंडी चुऱ्यामध्ये उष्णता साठवून ठेवली जाते. सूर्याची तीव्रता कमी झाल्यावर म्हणजेच सायंकाळी पाच वाजता नंतर त्यामधील गरम हवा ड्रायरच्या कॅबिनेटमध्ये सोडली जाते.

अशा प्रकारे ड्रायर मध्ये सायंकाळी पाच वाजल्या नंतरही अतिरिक्त दोन तास गरम हवा पदार्थ वळविण्यासाठी उपलब्ध होते. या ड्रायर मध्ये पदार्थ वळविल्यास वेळेची बचत होते सोबतच मालाची गुणवत्ता, चव, रंग, इत्यादी पारंपारिक पद्धतीच्या तुलनेने चांगल्या प्रतीची मिळते.

पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप

- एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप विकसित केला आहे.

- हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे संयंत्र आहे. बॅटरी फोटोव्होलटाइन पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते. त्यामुळे विजेची बचत होते. यामधून निघणारा विशिष्ट प्रकाश किडींना आकर्षित करून घेतो.

- यामध्ये सोलर फोटो फोटोव्होलटाइन पॅनेल, चार्ज कंट्रोलर आणि पॅनलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड अॅसिड बॅटरी वापरण्यात आली आहे. हा ट्रॅप हा पूर्णतः स्वयंचलित आहे.

- एक ट्रॅप हा दोन एकर क्षेत्रफळापर्यंत कार्य करू शकतो. ट्रॅपची उंची ही पिकाच्या उंचीनुसार १० फुटांपर्यंत ठेवता येते.

- बागेत फळबागेत, शेडनेट, पॉलिहाउसमध्ये वापरता येऊ शकतो.

व्यवस्थापन

- ट्रॅप शेतातील पिकाच्या मध्यभागी ठेवावा.

- स्टँडच्या मधोमध एक मोठा लोखंडी खिळा ठोकावा, त्या मधोमध स्टँड ठेवावा.

- ट्रॅपची उंची पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट वर असावी.

- शेतात ठेवण्याअगोदर इलेक्ट्रॉनिक सर्किटवरील बटण सुरू करून ठेवावे.

- कीटक भांड्यात पाच ते सहा लिटर पाणी भरावे. त्यात १० ते १५ मिलि रॉकेल मिसळावे.

- सौर पॅनेल नेहमी स्वच्छ ठेवावे.

Agriculture Management
Solar Project : सौर प्रकल्पासाठी अपेक्षेच्या केवळ दहा टक्केच जमीन

- पात्रात कीटक जमा झाल्यावर ते दुसऱ्या दिवशी काढून स्वच्छ करावेत. पुन्हा पाणी भरावे.

- धुके व ढगाळ वातावरण असल्यास दिवसा इलेक्ट्रिक पोर्ट लावून ५ ते ६ तास ट्रॅपची बॅटरी चार्जिंग करावी.

- ट्रॅपचे शेतात काम झाल्यावर इलेक्ट्रिक सर्किट वरील बटण बंद करून ठेवावे. जेणेकरून ट्रॅप स्वयंनियंत्रित पद्धतीने सुरू होणार नाही.

- ट्रॅपचे शेतात काम नसल्यास बॅटरी अधून मधून चार्ज करावी. जेणेकरून ट्रॅप वर्षानुवर्षे सुरळीत सुरू राहील.

संपर्क - डॉ. सुकेश्नी वाणे, ९४२३४७३६२९, (कृषी अभियांत्रिकी विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com