Desi Cotton PA: 837
Desi Cotton PA: 837 Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton PA 837: देशी कापसाचा नवीन सरळ वाण

Team Agrowon

परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापसाचे पीए ८३७ (Desi Cotton PA: 837) हे सरळ वाण विकसित केलंय. या नवीन वाणास भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) (ICAR) मान्यता दिलीय. हे वाण रसशोषक किडी (Sucking Pest) व दहीया रोगास सहनशील आहे. ते दक्षिण भारत विभागाकरिता प्रसारित करण्यात आलं आहे. हे वाण काही चाचण्यांनंतर लवकरच महाराष्ट्रात देखील प्रसारित केलं जाणार आहे.

देशात १९५० दरम्यान संपूर्ण देशी कापसाची लागवड होत होती. परंतु धाग्याची गुणवत्ता आणि कमी उत्पादकता या समस्या होत्या. त्यामुळे कापसाच्या अमेरिकी संकरित जाती आणि मागील दोन दशकांपासून संकरित बीटी जातींची लागवड होऊ लागली. हळूहळू बीटी कापसाने हातपाय पसरले. देशातील बहुतांश क्षेत्र बीटी कापसाच्या लागवडीखाली आले. देशी कापसाचे क्षेत्र नाममात्र उरलं आहे. परंतु वर्षानुवर्षे बीटी कापसाची लागवड केल्यानंतर आता त्याची परिणामकारकता कमी झाली आहे. त्यामुळे बीटी कापसावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. बीटी कापसाचा वाढता उत्पादन खर्च आणि घटत्या उत्पादकतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना हे पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरताना दिसत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा देशी कापसाचा पर्याय शोधत आहेत.

देशी कापूस का आहे फायदेशीर?
देशी वाणांवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होत नाही. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. देशी वाणांचा खर्च बीटीच्या तुलनेत कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे देशी तसेच सरळ वाणं ही कमी कालावधीची आहेत. त्यामुळे कापसाचे नवीन देशी व सरळ वाण विकसित करण्यावर सरकारी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांनी भर दिला आहे. कापसाच्या धाग्याची लांबी, मजबुती, तलमता तसेच पिकाची उत्पादकता यामध्ये देशी वाण सरस कसे ठरतील यावर संशोधन केले जात आहे.

परभणी येथील कापूस संशोधन केंद्र हे कापसाच्या देशी वाणावर संशोधन करणारे देशातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राने यापुर्वी पीए - ७४०, ८१२, ८१०, ५२८, ०८, २५५, ४०२ आणि ७८५ हे देशी वाण विकसित केले आहेत. या नव्या देशी वाणांची उत्पादकता आणि कापसाची प्रत बीटीच्या तुलनेत कुठेच कमी नाही. उलट काही वाण तर बीटीपेक्षा सरस आहेत.

महाराष्ट्रात एकूण कापूस लागवडीपैकी ९८ टक्के क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेलं आहे. त्यामुळे देशी कपसाच्या वाणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. म्हणून परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने दक्षिण भारत विभागाकरिता देशी कापसाचे पीए ८३७ हे सरळ वाण विकसित केलं आहे.


पीए ८३७ या सरळ वाणाची वौशिष्ट्येः


- या वाणाचे उत्पादन हेक्‍टरी १५ ते १६ क्विंटल मिळते.
- धाग्याची लांबी २८ मिली मिटर तर तलमपणा ४.८ आहे.
- हा वाण रसशोषक किडी, कडा करपा आणि दहीया रोगास सहनशील आहे.
- परिपक्व होण्याचा कालावधी १५० ते १६० दिवसाचा आहे.
- आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात या वाणाचे उत्पादन चांगले मिळाले आहे. लवकरच हे वाण काही चाचण्यांनंतर महाराष्ट्रात देखील प्रसारित केले जाणार आहे.
- देशी कापसाचे बी पुढे चार वर्ष बियाणे म्हणून वापरता येते.
- कोरडवाहू पद्धतीने कमी पाण्यात उत्पादन घेता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT