Agricultural Commodity Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Commodity Storage : शेतीमाल साठवणुकीचे नवीन तंत्रज्ञान

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

New Technology of Agricultural Commodity Storage : शाश्‍वत व्यवसाय उभारणी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन विविध पर्यायांचा शोध घेतात. पीकनिहाय मूल्यसाखळीचा अभ्यास केल्यानंतर या समुदाय आधारित संस्थांना गोदाम उभारणी हा व्यापारातील एक प्रमुख व्यवसाय असल्याचे लक्षात येते.

विविध योजनांच्या माध्यमातून गोदाम उभारणी पूर्ण झाल्यानंतर पुरवठा साखळीत पूर्ण क्षमतेने उतरून फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न होतात. गोदामात धान्य साठवणूक सुरू होते. परंतु धान्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी परिपूर्ण माहितीचा अभाव व सक्षम यंत्रणा नसल्याने गोदाम मालक किंवा व्यापारी आपला शेतीमाल राज्य वखार महामंडळ किंवा केंद्रीय वखार महामंडळाकडे जमा करून निर्धास्त होतात.

भारतीय अन्न महामंडळ आणि त्यासोबतच इतर गोदाम व्यवस्थापनातील शासकीय अथवा खासगी संस्थांना वर्षानुवर्षे धान्य साठवणुकीचा अनुभव असल्याने ते या क्षेत्रात यशस्वी आहेत. परंतु समुदाय आधारित संस्थांनी धीर न सोडता चिकाटीने माहिती व अनुभवाच्या जोरावर गोदामात साठविलेल्या मालाची गुणवत्ता टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. याकरिता भारतीय अन्न महामंडळ, त्यासोबतच गोदाम व्यवस्थापनातील शासकीय किंवा खासगी संस्थांशी संलग्न राहून गोदाम पुरवठा साखळीत आपला व्यावसायिक जम बसविण्याचा प्रयत्न करावा.

धान्य साठवणूक

पोत्यात धान्य साठविणे आणि पोतेविरहित धान्य साठविणे असे प्रकार आहेत. त्यातील पोतीविरहित एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धान्य साठविणे, ही एक नैसर्गिक साठवणूक पद्धती समजली जाते.

धान्य हे उष्णतेचे सौम्य वाहक आहे. धान्य एकत्रित साठविल्यानंतर त्याचा हा गुणधर्म उष्णतेचा अवरोधक बनतो. त्यामुळे फक्त असे धान्य की ज्याला बाहेरून नैसर्गिक साल असते उदा. गहू. तांदूळ, भरडधान्ये आणि कडधान्ये ही एकत्रितपणे हाताळणे, साठविणे सोपे असते.

तांदूळ, डाळी, पीठ यांसारख्या पदार्थांना एकत्रितपणे साठविण्यासाठी एका विशिष्ट तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. जर धान्य कीडविरहित, तापमान, आर्द्रता विरहित वातावरणात ठेवले तर बराच काळ टिकते.

अमेरिकेमध्ये मोठ्या बिन्समध्ये गव्हाची साठवणूक ४० वर्षांपर्यंत करूनही गुणवत्ता उत्तमपणे टिकून राहते. पाश्‍चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर लाखो मेट्रिक टन धान्याची साठवणूक बऱ्याच कालावधीपर्यंत करूनही धान्याच्या वजनात घट होत नाही. याकरिता उच्चप्रतीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने पर्यावरणातील घटकांचा धान्यावर परिणाम होत नाही. हे उच्चप्रतीचे तंत्रज्ञान सुरक्षित असल्याने माहिती घेणे गरजेचे आहे.

भारतीय अन्न महामंडळामार्फत पारंपरिक पद्धतीने गोदामांमध्ये फ्लॅट बिन्स, सायलोमध्ये गहू व तांदूळ या धान्याची साठवणूक केली जाते. धान्य पोतीविरहित एकत्रितपणे पारंपरिक गोदामांमध्ये फार कमी वेळेस साठविले जाते. एकत्रितपणे पोतेविरहित साठविण्यात येणारे धान्य पोत्यामध्ये साठविण्यात येणाऱ्या धान्याच्या साठवणुकीपेक्षा कमी जागा व्यापते.

ज्या ठिकाणी जागेची कमतरता असते अशा ठिकाणी एकत्रितपणे पोतेविरहित धान्य साठविणे हे आर्थिकदृष्ट्या सोईस्कर ठरते. जर पोतीविरहित धान्य साठवणूक बिन्समध्ये करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती व्यवस्थित समजली तर, या पद्धतीच्या साठवणूक प्रक्रियेमुळे धान्याचे नुकसान टळू शकते.

हर्मेटिक स्टोअरेज तंत्र

हवाबंद स्टोअरेज कंटेनरमध्ये बाहेर आणि आतल्या वातावरणादरम्यान हवा आणि आर्द्रतेची हालचाल थांबते.

ऑक्सिजन पातळी हळूहळू खाली येते. त्याऐवजी कार्बन डायऑक्साइड साठविला जातो.

कोरड्या शेतीमालाचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी पद्धत.

फायदे

कोणत्याही रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता नाही. सेंद्रिय साठवणूक पद्धत. कोणताही कीटक उपद्रव होत नाही.धान्यांची गुणवत्ता टिकते.

बियाण्यांची उगवण क्षमता जपली जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते.

शेड बांधण्याची आवश्यकता नाही. साठवण आणि फ्युमिगेशन चेंबर म्हणून वापरण्यायोग्य.

वापरात नसताना घडी घालून सुरक्षित ठेवता येते.

साठवणुकीचे महत्त्व

वर्षभरासाठी अन्न धान्याची तरतूद (अन्न सुरक्षा)

मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्याची तरतूद.

किंमत नियंत्रण आणि नियमन.

राष्ट्रीय स्थिरतेसाठी फायदा.

शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण.

आकस्मिक परिस्थितीत राखीव साठा.

साठवणुकीवर परिणाम करणारे घटक

सूक्ष्मजीव

किडे आणि कीटक

उंदीर व इतर प्राणी

पर्यावरणाचे घटक

पारंपरिक साठवणूक पद्धत

खड्डा / भूमिगत पद्धत

बांबू संरचना पद्धत

मातीची भांडी

ज्यूट बॅग / पॉलिथिन बॅग

मेटल डब्बे

आधुनिक साठवणूक पद्धत

वेअर हाउस (गोदाम)

कव्हर आणि प्लिन्थ (कॅप)

वातावरणीय संचयन प्रणाली नियंत्रित (एसी)

शीतगृह

सायलो बॅग

सायलो स्टोअरेज टॅंक

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT