Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Sale Tracking: खत विक्रीवर नव्या प्रणालीची नजर

L1 Android Device: जळगाव जिल्ह्यात खते विक्रीला गती व पारदर्शकता देण्यासाठी ‘एल-१ अँड्रॉइड प्रणाली’चे वितरण सुरू झाले आहे. विक्रेत्यांना यामुळे विक्रीचा अचूक डेटा मिळणार आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात खतांच्या विक्रीसंबंधी पूर्वी ई पॉस यंत्रणा कार्यरत होती. त्यात डेटा व गती (स्पीड) याबाबत अडचणी होत्या. या स्थितीत खत विक्रीची माहिती गतीने ऑनलाइन उपलब्ध व्हावी व यंत्रणा गतिमान असावी यासाठी ई पॉसमधील आधुनिक प्रणाली विकसित करून त्याचे वितरण जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना झाले आहे.

दोन टप्प्यात या एल १ अण्ड्रॉइड यंत्रणेचे वितरण झाले आहे. यामुळे खतांची विक्री नेमकी केव्हा व कुठे झाली, याची माहिती मिळू शकेल. जिल्ह्यातील सुमारे एक हजार खत विक्रेत्यांना या यंत्रणेचे वितरण झाले आहे. तर अन्य ७०० विक्रेत्यांनाही त्याचे वितरण केले जाईल.

शासकीय कंपन्यांनी या यंत्रणेचे वितरण केले आहे. काही खासगी कंपन्यांकडून याबाबत प्रतिसाद मिळालेला नाही. या कंपन्यांना या यंत्रणेचे वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तेथून प्रतिसाद मिळाल्यानंतर या कार्यवाहीस गती येईल. खत कंपन्या या यंत्रणेच्या वितरणात सहभागी असल्याने विक्रेत्यांना तत्काळ कार्यवाही करायची आहे.

लिंकिंगबाबत जनजागृतीचे फलक

खते व बियाण्यांवर कोणतेही लिंकिंग होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह शासनाच्या कृषी यंत्रणेने कार्यवाही हाती घेतली आहे. त्यात प्रत्येक कृषी केंद्रात लिंकिंगबाबत जनजागृतीचा फलक लावणे बंधनकारक केले आहे. तसेच या फलकावर कृषी यंत्रणेतील अधिकारी, तक्रार निवारण कक्षाचा क्रमांकदेखील आहे. शेतकरी या फलकावरील क्रमांकावर आपली तक्रार, अडचण सांगू शकतील. तसेच एक व्हॉट्सॲप क्रमांकदेखील आहे. त्यावरही शेतकरी आपली खते, बियाण्यासंबंधीची तक्रार देऊ शकतात.

खत विक्रीची तत्काळ माहिती मिळावी, किती खत शिल्लक आहे, किती विक्री झाली, यासाठी एल १ अण्ड्रॉइड यंत्रणा लाभदायी ठरणार आहे. याद्वारे खत विक्रीसंबंधी नियमन करण्याची गती वाढेल.
पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr. Homi Cherian: सेंद्रिय मसाला पीक उत्पादनाला प्रोत्साहन

Fake Success Story: फसव्या यशकथांचा सापळा

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

SCROLL FOR NEXT