Fertilizers Subsidy: समजून घेऊयात खतांवरील अनुदान

Nutrient-Based Subsidy: वाढत्या उत्पादन खर्चात शेतकऱ्यांना खत अनुदानाचा लाभ महत्त्वाचा ठरतो. या लेखात युरिया, एनपीके, डिएपी यांसारख्या खतांवरील अनुदानाचे स्पष्ट गणित व धोरणे समजावून सांगितली आहेत.
Subsidy
SubsidyAgrowon
Published on
Updated on

नरेश देशमुख

Indian Agriculture: देशातील ६० टक्के लोकसंख्या शेती, शेतीनिहाय उद्योगक्षेत्रावर अवलंबून आहे. गेल्या २० वर्षांत (२०००-०१ ते २०२३-२४)आपल्या देशातील अन्नधान्य उत्पादन १९७ दशलक्ष टनापासून ३३२ दशलक्ष टन (६८ टक्के वाढ) व फळे -भाजीपाला उत्पादन १३७ दशलक्ष टनांपासून ३१८ दशलक्ष टन (१३२ टक्के वाढ) साध्य केले आहे.

भारतीय लोकसंख्या २०५० पर्यंत सुमारे १७० कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य, फळे-भाजीपाला पुरवठा गरजेप्रमाणे करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हे साध्य करण्यासाठी प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. सध्या प्रति हेक्टर देशाचे उत्पादन ४.३३ टन प्रति हेक्टर असून ते २०५० पर्यंत ७.०९ टन प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे गरजेचे आहे.

Subsidy
Fertilizer subsidy : नॅनो खतांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार नाही; केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची माहिती

त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी गरजेप्रमाणे अन्नधान्य पुरवठा करता येईल.पीक उत्पादनवाढीमध्ये खतांचा वाटा ५० टक्के आहे. जगामध्ये खत वापरामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून खतांच्या आयातीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

खतांवरील अनुदान

शेतकऱ्यांना खत स्वस्त दरामध्ये मिळावे म्हणून केंद्र सरकार खतांवर अनुदान देत असते. खतांवरील अनुदान दोन प्रकारे विभागले गेले आहे.

अनुदानित युरिया : केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे युरिया खतांवरील अनुदान संपूर्ण असून त्याची विक्री किंमत शेतकऱ्यांसाठी २६६.५० रुपये आहे. बाकीचा उत्पादन व आयातीचा खर्च केंद्र सरकार स्वतः उचलत आहे.

Subsidy
Kharif Fertilizer Stock : शेतकऱ्यांना मिळणार वेळेत रासायनिक खते

अनुदानित फॉस्फेटिक व पोटॅश खते : या अंतर्गत सर्व एनपीके खते, एसएसपी आणि एमओपी खतांचा सहभाग आहे. या खतांमध्ये केंद्र सरकार निगडित अनुदान देऊन प्रत्येक खताचे उत्पादन / आयात खर्च व अनुदान लक्षात घेता प्रत्येक खताची विक्री किंमत खत कंपनी ठरविते.

या खतांचे अनुदान केंद्र सरकार वर्षात दोनदा ठरविते (खरीप व रब्बी हंगाम). खतांमध्ये असलेले घटक म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक यांचे दर प्रति युनिट ठरविले जातात. खालील तक्त्यामध्ये खरीप २०२५ चे रासायनिक खतांचे दर दिले आहेत. ज्या खतांमध्ये जस्त, बोरॉन आहे त्या खतासाठी अधिकचे अनुदान प्रत्येकी ५०० रुपये आणि ३०० रुपये प्रति टन दिले आहे.

अन्नद्रव्यांसाठी अनुदान

अन्नद्रव्य अनुदान प्रति किलो

नत्र ४३.०२

स्फुरद ४३.६

पालाश २.३८

गंधक २.६१

वरील दराशी आपण संयुक्त दाणेदार खतांच्या ग्रेडने गुणाकार केले तर सदर खतांचे दिले गेलेले अनुदान आपल्या लक्षात येईल. उदा. स्मार्टेक १०: २६: २६ या खताला नत्र, स्फुरद व पालाश दराने गुणाकार केले तर त्या खताचे अनुदान १६,२५७ रुपये प्रति टन असेल.

ग्रेडनिहाय खरीप अनुदान

श्रेणी अनुदान प्रति टन अनुदान प्रति बॅग

एनपीके १०:२६:२६ १६२५७ ८१२.८५

एनपीके १२:३२:१६ १९४९५ ९७४.७५

एपीएस २०:२०:०:१३ १७६६३ ८८३.१५

एनपी २४:२४:० २०७८९ १०३९.४५

डीएपी १८:४६:० २७७९९ १३८९.९५

एमओपी १४२८ ७१.४

एनपीके ८:२१:२१ फोर्टिफाइड १३८९७ ५५५.८८

एनपीके ०९:२४:२४ फोर्टिफाइड १५७०७ ६२८.२८

सिंगल सुपर फॉस्फेट ७२६३ ३६३.१५

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे प्रत्येक खताच्या गोणीवर एकूण दिलेले अनुदान लिहिलेले असते. शेतकऱ्यांनी हे अनुदान लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. इतर खते जसे बेनसल्फ, मायक्रोन्यूट्रिएंट, झिंकसल्फेट इत्यादी खतांना केंद्र सरकारचे कसले पण अनुदान मिळत नाही .

(लेखक महाधन ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com