Agrowon Yuva Sanman : कृषी विभागासह ‘ॲग्रोवन’च्या युवा सन्मान पुरस्कारांचे वितरण

Agrowon Agriculture Award : उल्लेखनीय काम करणाऱ्या २० शेतकऱ्यांना आणि ॲग्रोवन’च्या वतीने सात युवा शेतकऱ्यांचा गुरुवारी (ता. ११) मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
Agrowon Yuva Sanman
Agrowon Yuva SanmanAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कृषी विभागाच्या जिल्हा कृषी महोत्सवानिमित्त कृषी विभागाच्या वतीने कृषी पुरस्कारप्राप्त, प्रगतिशील शेतकरी, खरीप पीकस्पर्धा विजेते शेतकरी, एसआरटी तंत्रज्ञान प्रसार करणारे शेतकरी,

रेशीम उत्पादक आणि फलोत्पादनामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या २० शेतकऱ्यांना आणि ‘ॲग्रोवन’च्या वतीने सात युवा शेतकऱ्यांचा गुरुवारी (ता. ११) मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन आणि शेतकरी पुरस्कारवितरण छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळिग्राम,

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, माजी रेशीम उपसंचालक दिलीप हाके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बी. एस. तौर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी डी. डी. डेंगळे, अजय मोहिते (जालना) आदी उपस्थित होते.

Agrowon Yuva Sanman
Agrowon Agriculture Exhibition 2024 : दुसऱ्या दिवशीही प्रदर्शनाला अलोट गर्दी

डॉ. मोटे म्हणाले, की ॲग्रोवनच्या माध्यमातून दररोज ज्ञानाची गंगा घरोघरी येत आहे. त्यामुळे ॲग्रोवनचे महत्त्व आहे. ॲग्रोवन शेतकऱ्यांना ओळख देण्याचे काम करत आहे. सगुणा राइस तंत्रज्ञानाद्वारे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.

जमिनीचे आरोग्य अबाधित राहते. मराठवाड्यातील शेतकरी केवळ आता कोष उत्पादनच घेत नसून, अंडीपुंज उत्पादनातून किफायतशीर उत्पन्न मिळवत आहेत, एकूण खर्च व मिळणारे उत्पन्न विचार करता रेशीमशेती फायद्याची ठरेल, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात ॲग्रोवनचे संपादक संचालक चव्हाण म्हणाले, की ॲग्रोवन हे देशात नव्हे तर जगभरात अनोखी ओळख असलेले एकमेव कृषी दैनिक आहे. ॲग्रोवनच्या १८ वर्षांच्या वाटचालीत शेतकऱ्यांनी प्रेम, माया, पाठबळ दिले.

ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने समृद्ध करणारे ज्ञान देण्याचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांना उमेद घेऊन पुढे जाण्यासाठी, बळ देण्यासाठी ॲग्रोवनने व्रत घेतले आहे, असे ते म्हणाले.

Agrowon Yuva Sanman
Agrowon Agriculture Exhibition : पूरक, प्रक्रिया उद्योगासह नवतंत्रज्ञानाने वेधले लक्ष

कृषी विभागातर्फे पुरस्कार वितरण...

जिल्हा कृषी महोत्सव २०२४ अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी, खरीप हंगाम २०२२-२३ विभागीय पीक स्पर्धा, सगुणा राइस तंत्रज्ञान प्रसार, रेशीम शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

प्रगतिशील शेतकरी पुरस्कार...

नानासाहेब गायके (सुलतानाबाद, ता. गंगापूर), सिंकदर जाधव (जळगाव फेरणे, ता. छत्रपती संभाजीनगर), बालचंद्र घुनावत (लाखेगाव, ता.पैठण), निवृत्ती दिडोरे (औरंगपूर, ता. छत्रपती संभाजीनगर), अंबादास बनसोड (धावडा, ता. छत्रपती संभाजीनगर), अजय जाधव (खेडा, ता. पैठण), सुदाम शिरवते (मुलानी, ता. पैठण), राजेश इंगळे (माटेगाव, ता. खुलताबाद), वसंत कालबने (कृषी सहायक, पैठण).

पीक स्पर्धा विजेते शेतकरी...

रामेश्‍वर गायके (नांदलगाव, ता. पैठण), राजेश क्षीरसागर (शेकटा, ता. पैठण), भरत दांडगे (पुसेगाव, ता.पैठण), आबासाहेब भुसारे (सिरसगाव, ता. गंगापूर), सागर नलावडे (सावंगी बाजार, ता. खुल्ताबाद), लक्ष्मण गायकवाड (देवळा, ता. खुलताबाद), रतन तांबे (नागमठाण, ता. वैजापूर). सगुणा राइस तंत्रज्ञान प्रसार सुरेशसिंग बेडवाल, गुलाबराव खंडागळे, रेशीम उत्पादक शेतकरी सदाशिव गिते, पांडुरंग इनामे.

अॅग्रोवन युवा स्मार्ट पुरस्कार प्राप्त शेतकरी

अतुल मोहिते (टापरगाव, ता. कन्नड), कुलदीप वाघ (पाचोड खुर्द, ता. पैठण), बाबासाहेब पडूळ (लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर), अनिल शेळके, (कुंभेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर), राम काळे (वडवाडी, ता. पैठण), रूपाली संदीप नलावडे, (बाजार सावंगी, ता. गंगापूर), कालिंदी प्रवीण जाधव (मारोळा, ता.पैठण).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com