Textile Minister Sanjay Savkare Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy Policy: वस्त्रोद्योगासाठी लवकरच नवीन सौर ऊर्जा धोरण

Textile Minister Sanjay Savkare: अडचणी दूर करून खास वस्त्रोद्योग विभागासाठी एक नवीन धोरण आणण्यात येणार आहे’, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी पत्रकारांना दिली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ‘वस्त्रोद्योगात सर्वाधिक खर्च हा विजेवर होत असतो. त्यामुळे सध्‍या शासनाच्या माध्यमातून यासाठी अनुदान दिले जाते. सध्या याबाबत कोणतीच तक्रार नाही. पण विजेची मागणी ही न संपणारी आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सौर ऊर्जेचा पर्याय आणण्यात आला आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी दूर करून खास वस्त्रोद्योग विभागासाठी एक नवीन धोरण आणण्यात येणार आहे’, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी पत्रकारांना दिली.

मंत्री सावकारे इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी डीकेटीई, महेश स्पिनिंग मिल्स, व्यंकटेश्‍वरा सूतगिरणीसह डीकेटीई संस्थेला भेट दिली. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते ‘इचलकंरजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ या संस्थेच्या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल आदी उपस्थित होते.

मंत्री सावकारे म्हणाले, ‘वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर इचलकरंजी वस्त्रोद्योगातील विविध घटकांनी माझी भेट घेऊन आपल्या विविध समस्या सांगितल्या होत्या. त्या वेळी मी इचलकरंजीला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व घटकांना भेटून समस्या जाणून घेणार असल्याचे सांगितले होते.

त्यासाठीच आजचा दौरा होता. यामध्ये अनेक समस्या माझ्याकडे मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये काही प्रश्‍न सोडविताना शासकीय धोरणात बदल करावा लागणार आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार बदल केला जाईल. यातून वस्त्रोद्योगातील संबंधित घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

वस्त्रोद्योग विभाग हा शेतीनंतर अधिक रोजगारनिर्मिती करणारा विभाग आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात या विभागाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वस्त्रोद्योग हा अधिक गतीने चालला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे महाराष्ट्रातील मोठे हब आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाच्या विकासाला शासन नक्कीच साथ देईल.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT