Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : परराज्यातील म्हैस खरेदीसाठी गोकुळकडून नवी योजना, ४० हजार रुपये अनुदान

Gokul Dudh Sangh : वासरू संगोपन योजना, वैरण विकास, मुक्त गोठा या योजनांच्या अनुदानात ही वाढ करण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Gokul Milk Scheme : गोकुळ मार्फत दूध उत्पादकांना म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन व संघाच्या दूध संकलन वाढीस चालना देण्यासाठी परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदानामध्ये रुपये १० हजार इतकी वाढ करून नवीन अनुदान रुपये ४० हजार इतके करण्यात आले आहे.

यासोबतच वासरू संगोपन योजना, वैरण विकास, मुक्त गोठा या योजनांच्या अनुदानात ही वाढ करण्यात आली आहे. या सुधारित योजनाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना आर्थिक हातभार लागणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे माहिती दिली.

गोकुळ दूध संघाने २० लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये म्हैसीचे दूध संकलन संघ कार्यक्षेत्रामध्ये वाढावे यासाठी संघाच्यावतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. वैरण विकास कार्यक्रम, जातिवंत म्हैस खरेदी, जातिवंत मादी वासरू संगोपन, कृत्रिम रेतन कार्यक्रम यावर भर देण्यात आला आहे.

म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळने परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना चालू केली असून या योजनेला आणखी बळ देण्यासाठी दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन पर अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी सुधारित अनुदान योजना -

जातिवंत म्हैस खरेदीसाठी सध्या हरियाणा राज्यातील म्हैसीसाठी (मुऱ्हा,बन्नी,मेंढा) ३० हजार इतके अनुदान होते यामध्ये १० हजार रुपयांची वाढ करून ४० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच गुजरात राज्यातील म्हैसीसाठी (मेहसाना,जाफराबादी) २५ हजार अनुदान दिले जात होते त्यामध्ये १० हजार रुपयांची वाढ करून ते ३५ हजार रुपये करण्यात आले आहे.

म्हशींचा भाकड काळ कमी व्हावा तसेच गोठ्यात तयार झालेल्या पाड्या व रेड्यांना संतुलित आहार मिळावा या उद्देशाने देय अनुदानातील काही रक्कम पशुआहाराच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम संस्थेच्या दूध बिलातून रोख स्वरूपात देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे.

असे मिळणार अनुदान

हरियाणा (मुऱ्हा, बन्नी, मेंढा) : ४० हजार

गुजरात (मेहसाना, जाफराबादी) : ३५ हजार

इतर अनुदानात केलेली वाढ

जातिवंत मादी वासरू संगोपन योजनेतंर्गत जातिवंत रेडीसाठी दोन वेतासाठी २७ हजार अनुदान.

जातिवंत पाडीसाठी दोन वेतासाठी साडे पाच हजार अनुदान

वैरण विकास कार्यक्रमातंर्गत वैरण पिके घेण्यासह सायलेजसाठी ३५ टक्के अनुदान

ट्रॅक्टर ऑपरेट बेलिंग मशीन खरेदीसाठी २५ हजार अनुदान

वाळलेली वैरण (कडबा कुट्टी, गव्हाचे काड, तूर कुट्टी ) खरेदीसाठी १ हजार अनुदान

१ टन क्षमतेची सायलेज बॅगेसाठी २५ टक्के अनुदान

मुक्त गोठा सुधारित अनुदान १५ हजार

प्रस्ताव सादर करताच १० हजार रुपये उत्पादकांनी म्हैस खरेदी प्रस्ताव सादर केल्यानंतर वाहतूक खर्चा पोटी तात्काळ १० हजार संस्थेच्या दूध बिलातून दिले जाणार.

खरेदी केल्यानंतर किंवा व्याल्यानंतर १५ हजार रुपयांचे पशुआहार पॅकेज देणार. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर हरियाणा म्हशीसाठी १५ हजार तसेच गुजरात म्हशीसाठी १० हजार दूध बिलातून अनुदान देणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT