Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी

Farmers Issue : देशात आज शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले.

Team Agrowon

Akola News : देशात आज शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. (कै.) वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रमानिमित्त अकोल्यात गुरुवारी (ता.१२) झालेल्या सहकार महामेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी, इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘अण्णासाहेब कोरपे यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी घालवले. सहकार उभा केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जिल्हा बँकेचे २७ वर्षे ते चेअरमन होते. त्यांनी लावलेली शिस्त आजच्या पिढीने कायम जोपासली. त्यामुळे बँकेचा एनपीए आज ६ टक्क्यांच्याही आत आहे.

देशात आज शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न तयार झाले आहेत. कापूस आयातीसारखा निर्णय दुर्दैवाने घेतला जातो. गेल्या काही वर्षात कापसाचे उत्पादन घटले. सोयाबीनचेही सातत्याने नुकसान होत आहे. सरकारने खरेतर शेतकरी हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना तसे होत नाही. कंत्राटी पद्धतीने नेमणुकीचे धोरण सरकार राबवत आहे.

कापूस किंमत घसरली. संत्र्यालाही दर मिळत नाहीत. कांदा उत्पादकांचेही हाल होत आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांची बांधिलकी नसलेला नेता निवडून यायला नको. राज्य कुणाच्याही हातात द्या. पण काळ्या आईशी इमान राखणाऱ्यांना साथ द्या, असेही ते म्हणाले.

नितीन गडकरी, जयंत पाटील, अनिल देशमुख, डॉ. मायी यांनी मार्गदर्शनात (कै.) अण्णासाहेब कोरपे यांच्या योगदानाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन ॲड. अनंत खेळकर यांनी केले तर आभार रमेश हिंगणकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : विश्रांतीनंतर जोरदार बरसला! दोन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

Warehouse Receipt: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व

Modified Atmosphere Packaging: सुधारित वातावरण पॅकेजिंगच्या क्षमता, गुणधर्म

Onion Price: कांदादरासाठी खणखणले फोन; मंत्री, लोकप्रतिनिधी जेरीस

Agriculture Scientists: शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

SCROLL FOR NEXT