Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: साडेतीन हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज

Kharif 2025: खरीप २०२५ मध्ये जून अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील बँकांनी ५१ हजार १६ शेतकऱ्यांना ४६७ कोटी ९१ लाख ६४ हजार रुपये (३०.९६टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

Team Agrowon

Parbhani News: खरीप २०२५ मध्ये जून अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील बँकांनी ५१ हजार १६ शेतकऱ्यांना ४६७ कोटी ९१ लाख  ६४ हजार रुपये (३०.९६टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. त्यात ३ हजार ५०१ शेतकऱ्यांना ५१ कोटी ६१ लाख ६ हजार रुपये नवीन पीककर्ज वाटप आहे.

४७ हजार ५१५ शेतकऱ्यांनी ४१६ कोटी ३० लाख ५८ हजार रुपये कर्जाचे नूतनीकरण केले आहे.परभणी जिल्ह्यातील बँकांना यंदाच्या खरिपात १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे  उद्दिष्ट देण्यात आले आहे.

३० जून अखेर राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बँकांनी १० हजार १७३ शेतकऱ्यांना १३१ कोटी ३९ लाख रुपये,महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १५ हजार ७११ शेतकऱ्यांना १७९ कोटी ६७ लाख रुपये,जिल्हा  मध्यवर्ती  सहकारी बँकेने २४ हजार ४१५  शेतकऱ्यांना १४० कोटी ४४ लाख रुपये पीककर्ज वाटप केले.

२०२४मध्ये ३० जून अखेरपर्यंत ५८ हजार १४४ शेतकऱ्यांना ४४३ कोटी ५८ लाख रुपये (३०.१६टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक,राष्ट्रीयीकृत बँका,खासगी बँका असा क्रम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT