S T Bus  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ST Depot : सोलापूर आगाराला लवकरच नव्या बसेस

ST Mahamandal : सोलापूर हे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर हे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील.

सध्या बार्शी आगाराला १० नव्या बसेस मिळाल्या असून उर्वरित ८ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (ता.१९) दिली.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहणी केली. प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्याशी चर्चा केली.

यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस, बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात निवेदने सादर केली. स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली. या भेटी दरम्यान नियंत्रक अमोल गोंजारी उपस्थित होते.

पाच वर्षांत २५ हजार बसेस घेणार

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, की राज्य शासनाने दरवर्षी ५ हजार नवीन कोऱ्या एसटी बसेस महामंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जेणेकरून भविष्यात सर्व सामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT