ST Employees PF : एसटी कर्मचाऱ्यांचे मागील ४ महिन्यांपासून पीएफचे पैसे थकीत; कर्मचाऱ्यांची तारांबळ

ST Corporation Maharashtra : एसटी महामंडळाने १५ टक्के भाडेवाढ केली. नवीन बस घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती पाहून ही भाडेवाढ केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.
ST Employees PF
ST Employees PFagrowon
Published on
Updated on

ST Employees PF Maharashtra : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेळेत पगार होत नसल्याच्या अनेकदा तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र, थकीत पगाराबरोबर आता महामंडळाने पीएफ थकीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील महिन्यात एसटी महामंडळाने १५ टक्के भाडेवाढ केली. नवीन बस घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती पाहून ही भाडेवाढ केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. परंतु कामगारांची आयुष्याची जमापुंजी असलेल्या पीएफ थकीत असल्याने महामंडळात सर्वकाही आलबेल असल्याचे बोलले जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे महामंडळाने मागील ४ महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून एसटी महामंडळाने पीएफचे हफ्ते भरले नसल्याने ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्यांना पैसेच मिळवता येत नाहीत. यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

एसटी कर्मचारी सेवानिवृत्त किंवा घरातील कार्यासाठी तसेच घर बांधकामासाठी पीएफ काढता येत नसल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. एस.टी. महामंडळाकडे निधीचा तुटवडा असल्याने प्रॉव्हीडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून हे हप्ते थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागतोय, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली.

ST Employees PF
ST Employees Strike : अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; मूळ वेतनात तब्बल ६ हजार ५०० रुपयांची वाढ

कर्मचारी सेवानिवृत होत आहेत, त्यांचा फंड मात्र एक महिन्याच्या आत दिला जात आहे. परंतु, कामावर असलेल्या कर्मचारी वर्गाला वेट अँड वॉच अशी भूमिका महामंडळाचे आहे. त्यामुळे, एसटीच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. आमच्या मागण्यांकडे शासन किंवा महामंडळातील अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पीएफ हप्त्यासाठी महिन्याला ४८० ते ४९० कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करावे लागते.

याबाबत गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे जमा होत नाहीत हे अत्यंत वेदनादायी आहे. कष्टकरी-कामगारांच्या पीएफच्या हफ्त्याचे पैसे पाठवले जात नाहीत, हे भरत गोगावले अध्यक्ष असल्यापासून सुरू झाले आहे. तसेच, सध्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही याबाबत १ आठवड्यांपूर्वीच माहिती दिली आहे. गिरीष देशमुख नावाचे अधिकारी आहेत, जे दुसऱ्या कामासाठी कामगारांच्या हक्काच्या पैशाचा वापर करण्यासाठी देत आहेत. त्यामुळे, गिरीष देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे", गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com