Agricultural Business Management College Agrowon
ॲग्रो विशेष

Colleges of Agriculture : भोकरदन आणि बार्शीत नवीन कृषी महाविद्यालये

Agriculture College Accreditation : राज्यातील दोन शैक्षणिक संस्थांना कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर कृषी महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज्यातील दोन शैक्षणिक संस्थांना कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर कृषी महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. भोकरदन आणि बार्शी येथे ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. तर बारामती येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वाढीव तुकडीस मान्यता देण्यात आली आहे.

ही महाविद्यालये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून पदवी प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरणाने मान्य केलेल्या नियमानुसार राबविण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत भोकरदन येथील शिवाजी महाराज स्मारक समितीच्या शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय, विझोरा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आणि बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, पुणे संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, शारदानगर या महाविद्यालयास प्रतिवर्ष ६० प्रवेशक्षमतेच्या तुकडीवाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये १२० विद्यार्थी प्रतिवर्ष अशी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही मान्यता देण्यात आली आहे. नव्याने मान्यता देण्यात आलेल्या दोन महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रविवर्ष ६० विद्यार्थी आहे. ही महाविद्यालये कायमस्वरूपी खासगी तत्त्वावर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT