Agriculture College, Pune : पुणे कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. माने

Pune News : पुणे कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. महानंद माने यांची सोमवारी (ता. १५) नियुक्ती करण्यात आली आहे.
Agriculture College
Agriculture CollegeAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Dr. Mahanand Mane : पुणे : पुणे कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. महानंद माने यांची सोमवारी (ता. १५) नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्याच्या जागी श्री. माने यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. माने हे जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विषयातील अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. त्यांनी राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९९० मध्ये बी.टेक. आणि १९९२ मध्ये एम. टेक. पदवी प्राप्त केली आहे. तसेच २००४ मध्ये त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विशेष प्रावीण्यासह पीएचडी प्राप्त केली आहे.

Agriculture College
Agriculture College : पापळ येथील कृषी महाविद्यालय अडकले लालफितशाहीत

सुरुवातीला दापोली येथील कृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून १९९५ पासून ते कार्यरत होते. जून २००५ पासून सहयोगी प्राध्यापक आणि जानेवारी २००९ पासून ते प्राध्यापक पदावर कार्यरत होते. २०१९ पासून ते राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग येथे ‘विभाग प्रमुख’ म्हणून कार्यरत होते. आपल्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये डॉ. माने यांनी विविध विषयांवरील ६५ तांत्रिक लेख लिहिले आहेत. ३८ संशोधन शिफारशी आणि २८ पुस्तकांचे लेखन केले. त्यांना २०१७ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या पाच उत्कृष्ट लेखांना पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. माने यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठात ‘सिंचन उद्यान’ ही अभिनव संकल्पना साकारली असून, सिंचनाच्या सर्व आधुनिक पद्धती एका ठिकाणी एकाच क्षेत्रावर स्थापित केल्या आहेत. त्यांच्या पुढाकाराने विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‘रिमोट सेन्सिंग जी आय एस’ प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

संशोधनासाठी आणले दोन प्रकल्प :
डॉ. माने यांनी जागतिक बँकेचा ‘पेंच सिंचन प्रकल्प’ आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा ‘सोलर पोअर्ड सेंट्रल पिव्होट सिस्टिम फॉर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्वर’ असे दोन महत्त्वाचे बाह्य स्रोत प्रकल्प प्रमुख संशोधक म्हणून आणले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com