Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : खरिपापूर्वीच रुजू होणार नवे कृषी सहायक

मनोज कापडे

Pune News : ः राज्यभर खरिपापूर्वी १७४४ नवे कृषी सहायक उपलब्ध होण्यासाठी कृषी आयुक्तालयाने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी परीक्षांचा निकाल लवकर लावण्याबाबत पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ठाणे विभागात २४७, तर पुणे १८२, नाशिक १८९, अमरावती १५६, छत्रपती संभाजीनगर १९६, नागपूर ३६५, लातूर १५९ तसेच कोल्हापूर विभागात २५० नवे कृषी सहायक नेमले जाणार आहेत. या भरतीसाठी १६ आणि १९ जानेवारीला राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती.

त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल केव्हा लागणार, पुढील प्रक्रिया काय असेल तसेच प्रत्यक्ष नेमणूकपत्रे केव्हा मिळणार याविषयी उमेदवारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी सहायकांच्या यापूर्वीच्या सर्व परीक्षा विभागीय कृषी सहसंचालकांच्या पातळीवर झालेल्या आहेत. या प्रक्रिया स्थानिक पातळीवर होत असल्यामुळे जलद होतात.

परंतु, पारदर्शकतेसाठी यंदा प्रथमच ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत परीक्षा घेतल्या गेल्या आहेत. किमान ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे अपेक्षित असते. अद्याप उशीर झालेला नाही. तरीदेखील निकाल लवकर लावण्याबाबत कंपनीशी पत्रव्यवहार केला गेला आहे. त्यामुळे खरिपापूर्वीच राज्यात क्षेत्रीय पातळीवर नवे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते.

‘‘कृषी सहायकपदाचे निकाल घोषित झाल्यानंतर तातडीने नेमणूकपत्र मिळणार नाही. त्यासाठी शासकीय प्रक्रियेतून जावे लागणार आहे. निकाल हाती मिळाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर तात्पुरती (प्रोव्हिजनल) यादी लावली जाईल. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुन्हा अंतिम यादी लावण्यात येईल.

नेमणूकपत्रे प्रत्यक्षात जारी करण्यापूर्वी पुन्हा कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यामुळे या कालावधीला एक ते दीड महिना लागू शकेल. आस्थापना विभागात आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे नियमित कामे सांभाळून भरती प्रक्रिया राबवावी लागत आहे,’’ असे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

कृषी आयुक्तालयाने ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत गेल्या २३ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. यामुळे लघुटंकलेखक, लघुलेखक निम्न श्रेणी व उच्च श्रेणीतील लघुलेखकांच्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT