Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Concessions : नव्या १३ मंडलांनाही मिळणार दुष्काळी सवलती

Drought Condition : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर ४० तालुक्यांमधील पर्जन्यमापक यंत्र न बसविलेल्या २२४ नव्या गावांमध्ये (महसुली मंडलांना) दुष्काळसदृश सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Team Agrowon

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील २४ जिल्ह्यांतील एक हजार २१ मंडलांपैकी विभाजन होऊन नवीन महसुली मंडले स्थापन करण्यात आली आहेत. त्या मंडलांत अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेली नाहीत.

अशा नवीन मंडलांचाही दुष्काळसदृश मंडलांत समावेशाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पाऊस पडलेल्या जिल्ह्यातील नवीन १३ महसूल मंडलांचा समावेश आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले होते. मात्र, काही तालुक्यांतील मंडलांमध्ये दुष्काळाची दाहकता मोठी असल्याने त्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली होती.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर ४० तालुक्यांमधील पर्जन्यमापक यंत्र न बसविलेल्या २२४ नव्या गावांमध्ये (महसुली मंडलांना) दुष्काळसदृश सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यामुळे या मंडलांमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात सूट आदी सवलती लाभणार आहेत.

मंडलांना मिळणाऱ्या सवलती

शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, ‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी सवलती दिल्या जातात.

तालुकानिहाय मंडले अशी : (कंसात मंडलांची संख्या)

नांदगाव (३) न्यायडोंगरी, बाणगाव बुद्रुक, भार्डी

चांदवड (२) शिंगवे, धोंडबे

नाशिक (२) महिरावणी, भगूर

बागलाण (३) मुंजवाड, किकवार खुर्द, टेंभे वरचे

निफाड (२) पालखेड व विंचूर

देवळा (१) खर्डे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT