Drought Condition : नाशिक जिल्ह्यातील राहिलेली मंडळे दुष्काळसदृश यादीत

Drought Update : नांदगाव तालुक्यातील बाणगाव, भार्डी, न्यायडोंगरी मंडळांचा शासनाकडून दुष्काळसदृश यादीत समावेश करण्यात आला आहे.
Drought
Drought Agrowon

Nandgaon News : नांदगाव तालुक्यातील बाणगाव, भार्डी, न्यायडोंगरी मंडळांचा शासनाकडून दुष्काळसदृश यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे या मंडळातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. दुष्काळसदृश यादीत समावेश झाल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नांदगाव तालुक्यात २०२३ मध्ये मॉन्सून काळात अतिशय कमी पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती. यानंतर शासनाने ३१ ऑक्टोबर २०२३ ला शासन निर्णय काढत राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता.

Drought
Drought Rural Maharashtra : दुष्काळाचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, कर्जाच्या उचलीस शेतकरी धजावतोय

यात नांदगाव तालुक्याचा समावेश नव्हता. त्यानंतर जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले होते. त्या मंडळांचा देखील दुष्काळसदृश यादीत समावेश केला होता. यात नांदगाव तालुक्यातील आठ पैकी पाच मंडळांचा समावेश करण्यात आला होता.

परंतु दुष्काळसदृश परिस्थिती असताना देखील तालुक्यातील बाणगाव बुद्रुक, भार्डी आणि न्यायडोंगरी मंडळाचा समावेश या यादीत समावेश करण्यात आला नव्हता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी नांदगाव तहसील कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केले. त्यानंतर सातत्याने तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करीत गावागावांत जनजागृती केली.

Drought
Maharashtra Drought : २२४ महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित

२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, खरीप हंगाम २०२३ करता दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या १ हजार २१ मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ करण्यात आले आहे, त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही अशी नवीन महसूल मंडळेदेखील दुष्काळसदृश मंडळे म्हणून जाहीर करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार तालुक्यातील बाणगाव बुद्रुक, भार्डी आणि न्यायडोंगरी या मंडळासह राज्यातील २२४ मंडळांचा समावेश या यादीत समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मंडळे

तालुका मंडळ

चांदवड शिंगवे, धोडंबे

नाशिक महिरावणी, भगूर,

सटाणा मुंजवाड, किकवारी खुर्द, वरचे टेंभे

निफाड पालखेड, विंचूर, देवळा, खर्डे

नांदगाव बाणगाव बुद्रुक, भार्डी, न्यायडोंगरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com