Anup Kumar Agrowon
ॲग्रो विशेष

Anup Kumar : उत्पादकतेसह शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढणे आवश्यक

माणिक रासवे

Parbhani News : ‘‘शेतीमालाची केवळ उत्पादकता वाढच नव्‍हे तर शेतकऱ्यांच्या निव्‍वळ नफ्यात वाढ महत्त्वाची आहे. शाश्‍वत उत्‍पादनासाठी आवश्यक योग्‍य शिफारशी शेतकऱ्यांना द्याव्या लागतील. कृषी तंत्रज्ञानाचा परिणामकारक प्रसार व्हावा. त्यासाठी शेतकऱ्यांना शेती शाळांद्वारे प्रशिक्षण द्यावे लागेल,’’ असे प्रतिपादन कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, आत्मा, कृषी विभागातर्फे आयोजित पश्चिम विभागीय कृषी मेळाव्यात गुरुवारी (ता.२२) दूरदृश्‍यप्रणालीद्वारे अनुप कुमार बोलत होते. अनुप कुमार म्‍हणाले, ‘‘राज्यातील कापूस, सोयाबीन, बाजरी, मूग आदी पिकांची सरासरी उत्‍पादकता कमी आहे. उपलब्‍ध संसाधनांचा नियोजनपूर्वक वापर करावा लागेल. हवामान बदलाचा मोठा परिणाम पर्जन्‍यमानावर होत आहे. अनेक वेळा अतिवृष्‍टी, दुष्काळ, गारपीट आदी नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.’’

डॉ. एन. एम. कसपटे यांनी सीताफळ लागवडीवर, डॉ. बी. एम. कापसे यांनी गटशेतीद्वारे आंबा लागवडीवर, चंद्रकांत वरपुडकर यांनी आंबा फळबाग व्‍यवस्‍थापनावर, अजय मोहिते यांनी तुती रेशीम शेती उद्योग, डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी सिंचन पाणी व्‍यवस्‍थापनावर, तर मनोज हाडवळे यांनी कृषी पर्यटनावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सुभाष शर्मा, संतोष आळसे, विद्या रुद्राक्ष, डॉ. ए. एस. राजपूत, शिवराम घोडके आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. इंद्र मणी, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘शेतकऱ्यांनी शेतीमाल स्वतः विक्री करावा’

दुपारच्या चर्चासत्रात ‘लोकसभातून ग्रामीण विकास’ या विषयावर पाटोदा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादनासह शेतीमाल विक्रीचे कौशल्य अवगत करावे.

त्यादृष्टीने कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. प्रक्रिया होऊन शेतीमाल ग्रामीण पातळीवर विक्री झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी लाज न बाळगता शेतीमाल स्वतः विक्री करावा. ग्रामपंचायतींनी शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करावे. शेतीमाल विक्रीसाठी उपक्रम राबवावेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT