Bitter Gourd Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Bitter Gourd Nematode : कारले पिकातील ‘सूत्रकृमी’

Crop Disease : कारले पिकामध्ये ॲन्थ्रॅकनोज, अल्टरनेरिया,  मर रोग, जिवाणूजन्य रोग, डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, सरकोस्पोरा ठिपके, मोझॅक इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

Team Agrowon

राहुल वडघुले

कारले पिकामध्ये ॲन्थ्रॅकनोज, अल्टरनेरिया,  मर रोग, जिवाणूजन्य रोग, डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, सरकोस्पोरा ठिपके, मोझॅक इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. आजच्या लेखामध्ये कारले पिकातील सूत्रकृमी या विषयी माहिती घेऊ. सूत्रकृमी या जमिनीत राहून मुळांवर वाढतात. सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकाची पाने पिवळी पडतात. ही लक्षणे अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी दिसतात. त्यामुळे प्रादुर्भाव ओळखून येत नाही.

ओळख

सूक्ष्मजीवाचे नाव ः सूत्रकृमी

इंग्लिश नाव ः रूट नॉट निमॅटोड (Root Knot Nematode)

शास्त्रीय नाव ः Meloidogyne incognita

परजीवी प्रकार ः Obligate Parasite

डिव्हिजन ः Nematoda

लक्षणे

पिकाची पाने पिवळी पडतात. ही लक्षणे अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी दिसतात.

पाने आकाराने लहान होतात.

निरोगी झाडाच्या तुलनेत पानांची संख्या कमी होते. झाडावर पाणी व अन्नद्रव्ये यांची कमतरता किंवा ताण जाणवतो.

जमिनीखाली मुळांवर मोठ्या मोठ्या गाठी दिसून येतात. या गाठी वेगवेगळ्या न राहता एकत्र येऊन मोठी गाठ निर्माण करतात. तंतूमुळे दिसत नाहीत. प्रमाण वाढल्यावर झाड वाळते व मरते.

नुकसान

सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे कारले पिकामध्ये सुमारे ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके

सूत्रकृमींचा प्रादुर्भाव विविध फळपिके, भाजीपाला आणि फूल पिकांमध्ये आढळून येतो.

भाजीपाला पिके ः टोमॅटो, वांगी, भेंडी कलिंगड, खरबूज, काकडी, गिलके

फळपिके ः डाळिंब, केळी, सफरचंद, द्राक्षे

फुलपिके ः गुलाब, शेवंती

इतर पिके ः ऊस, कापूस

प्रादुर्भाव कसा होतो

डिसेंबर ते मार्च महिन्यात मादी सूत्रकृमी मुळांभोवती अंडी घालतात. अंड्यामधून सूत्रकृमी बाहेर येतात.

या सूत्रकृमीची पहिली अवस्था अंड्यामध्येच पूर्ण होते. सूत्रकृमी मुळामध्ये जाऊन तिथे वाहक पेशी (Vascular Bundle- Xylem, Ploem, Sclerenchyma) मध्ये प्रादुर्भाव करतात. त्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होतात.

गाठी निर्माण झाल्यावर हे सूत्रकृमी स्थिर होऊन एकाच ठिकाणी खात राहतात.

नर व मादी सूत्रकृमी ३ वेळा कात टाकून प्रौढ होतात. प्रौढ झाल्यानंतर ते मुळांमधून बाहेर येतात. नर जमिनीमध्ये जातात, तर मादी मुळांभोवती राहून १५० ते १५०० अंडी घालते.

नियंत्रणाचे उपाय

लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षम वाण निवडावे.

पीक फेरपालट करावी. आधीचे पीक हे सूत्रकृमींना बळी पडणारे नसावे.

जैविक बुरशी जसे की Paecilomyces lilacinus चा वापर आळवणीसाठी करावा.

निमपेंड किंवा करंज पेंडचा वापर करावा.

शेताभोवती झेंडू लागवड करावी.

शिफारशीत सूत्रकृमीनाशकांचा वापर करावा.

लेबलक्लेम प्राप्त सूत्रकृमीनाशके

फ्लुओपायरम (३४.४८ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

कार्बोफ्युरॉन (३ टक्के सीजी)

फ्ल्युएनसल्फॉन (२ टक्के जीआर)

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण लंब गोलाकार, लांबट आकाराचे, दोऱ्यासारखे रंगहीन सूत्रकृमी वळवळ करताना पाहू शकतो. सूत्रकृमीचा मागील भाग हा टोकदार असून तोंडाकडील भाग जरासा गोलाकार (Offset) असतो. अंडी दंड गोलाकार आकाराची असून सूक्ष्मदर्शकाखाली व्यवस्थित दिसून येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT