Mulberry Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Cultivation : तुती लागवडीच्या नोंदणीकडे कृषी, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

Reshim Department : रेशीम विभागाकडे तुती लागवडीसाठी ४०४ एकरवर नोंदणी झाली आहे. या नोंदणीकडे कृषी विभाग व जिल्हा परिषदेकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात महारेशीम अभियान २०२३-२४ या वर्षासाठी सातशे एकरावर तुती लागवडीचे उद्दिष्ट रेशीम विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेला दिले आहे. रेशीम विभागाकडे तुती लागवडीसाठी ४०४ एकरवर नोंदणी झाली आहे. या नोंदणीकडे कृषी विभाग व जिल्हा परिषदेकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत तुती लागवडीला चालना मिळावी, यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्हा रेशीम विभाग, कृषी आणि जिल्हा परिषद विभागाकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले होते.

जिल्ह्यातील रेशीम विभागाला ३०० एकर, कृषी विभाग २०० आणि जिल्हा परिषदेकडे २०० एकर असे ७०० एकराचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्याची संयुक्त जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी महारेशीम अभियानाचा रथ गावोगावी फिरवून त्याचे प्रबोधन केले.

दरम्यान, रेशीम विभागाने तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहिक केले आहे. रेशीम विभागाला ३०० एकराचे उद्दिष्ट असून आजअखेर ४०४ एकरावर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे रेशीम विभागाकडूनही जिल्हा परिषद आणि कृषी विभागाकडे तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

मात्र, जिल्हा परिषद तसेच कृषी विभागाने मात्र फारसे स्वारस्य दाखविल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु या कृषी व जिल्हा परिषदेकडून मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

महारेशीम अभियान योजनते जिल्ह्यातील शेतकरी तुती लागवड करण्यासाठी पुढे येत आहेत. आमच्या विभागाकडून ४०४ एकरावर नोंदणी झाली आहे.
बी. बी. कुलकर्णी, रेशीम विकास अधिकारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : अतिवृष्टीबाधितांना ४८० कोटी रुपयांच्या निधी वाटपास मान्यता; शासन निर्णय जारी

Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप

Ethanol Blending: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवा, साखर उद्योगाची मागणी

Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल

Dust Pollution: धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ

SCROLL FOR NEXT