Medicinal Neem  Agrowon
ॲग्रो विशेष

Neem Medicinal Benefits : मधुमेहावर कडूनिंब गुणकारी

Diabetes Control : कडूनिंब झाडाची पान, फळं, फुलं, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत.

Team Agrowon

Health Benefits : मधुमेह या आजाराचा जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. वैद्यकीय भाषेत मधुमेहाला डायबिटिस मेलिटस असे म्हणतात.  

मधुमेहामुळे माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. 

शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. या आजारावर वेळीच उपचार नाही केल्यास रुग्णाला इतर आजारही वाढतात. औषधे आणि आहारातून मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.  

त्यामुळे मधुमेहाच्या नियंत्रणासाठी विविध उपचार केले जातात. मात्र एका संशोधनात असे दिसून आले आहे की, कडुनिंबाची पाने इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी पुन्हा निरोगी करु शकतात.

 कडूनिंब झाडाची पान, फळं, फुलं, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत.

त्यामुळे मधुमेह असलेले रुग्ण दररोज कडुनिंबाच्या पानांचे सेवन करु शकतात. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ३-४ ताजी पाने घेऊन पाण्याने धुवून चांगली चावून त्याचा रस गीळून टाकावा. कडुनिंबाची पाने खल्ल्यास रक्त स्वच्छ राहते. तोंडाचे आरोग्य सुधारते. मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ राहतात. त्वचेसाठीही कडूनिंब उपयुक्त आहे. जखमा आणि फोड बरे करण्यासाठी कडूनिंबाचा उपयोग होतो. मात्र कडूनिंबाचा आहारात उपयोग करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT