Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : ‘चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्‍यकता’

Agriculture News : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च पुणेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल येथील यूएसके ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे श्री. काशीद यांचा विश्रामबागस्थित मुख्यालय इमारतीत सत्कार करण्यात आला.

Team Agrowon

Sangli News : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर-सातारा-सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च पुणेचे सदस्य विनायक काशीद यांनी येथे एका सत्कार सोहळ्यात दिली.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च पुणेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल येथील यूएसके ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे श्री. काशीद यांचा विश्रामबागस्थित मुख्यालय इमारतीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सांगली कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी सुरेंद्र पाटील, उद्योजक संजय कदम, कंपनीचे डायरेक्टर उमाकांत माळी, संभाजी चव्हाण, अधिकारी दत्तात्रय घाटगे, सागर पाटील, सुधीर पाटील, केराप्पाण्णा माळी आदी उपस्थित होते. या वेळी श्री. काशीद यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचा आवाका प्रचंड मोठा आहे.

कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस घडत असणाऱ्या प्रचंड घडामोडी, नवनवे संशोधन पाहिल्यास ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणे अत्यावश्यक आहे. शेतकरी व विद्यापीठातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्यात आणखी विद्यापीठे व महाविद्यालयांची गरज आहे.

त्यामुळे नव्या विद्यापीठासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याला लवकरच यश येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच द्राक्षाचे क्लस्टरही सांगली जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी उपस्थितांनी सांगली जिल्ह्यात भाजीपाला संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी केली. याबरोबरच द्राक्ष व हळद संशोधन केंद्रासाठीची व्यापकता वाढावी, असेही मत मांडण्यात आले. विशाल सोनवणे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT