BJP Vs Congress Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 Result : सुरुवातीचे कल; देशात एनडीए आघाडीवर तर महाराष्ट्रात महाआघाडीची महायुतीला टक्कर!

महाराष्ट्रात ४८ पैकी ४८ जागांचे कल समोर आले आहे. भाजपला १२, शिवसेना (शिंदे) ८, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) ८, राष्ट्रावादी कॉँग्रेसचे (अजित पवार) १, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस १० तर कॉँग्रेस १० जागांवर आघाडी आहे.

Dhananjay Sanap

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला मंगळवारी (ता.४) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. एकूण ५४३ जागापैकी ५३६ जागांचे कल समोर आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सकाळी १० वाजून ४५ पर्यंत एनडीएला २९२ तर इंडिया २२५ जागांवर तसेच इतर २४ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्रात ४८ पैकी ४८ जागांचे कल समोर आले आहे. भाजपला १२, शिवसेना (शिंदे) ८, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) ८, राष्ट्रावादी कॉँग्रेसचे (अजित पवार) १, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस १० तर कॉँग्रेस १० जागांवर आघाडी आहे. तर देशात एनडीएकडे कल असले तरी महाराष्ट्रात मात्र चुरशीची लढत रंगलेली आहे.

मतदारसंघांचे कल (सकाळी १०:३० पर्यंत)

बारामती मतदार संघातून महाआघाडीच्या सुप्रिया सुळे ३४३ मतांनी आघाडीवर आहेत. तर सुनेत्रा पवार पवार पिछाडीवर आहेत. तर अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे निळेश लंके ८५१ मतांनी आघाडीवर आहेत. तर सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. बीडमधून महायुतीच्या पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. तर बजरंग सोनवणे १६५ मतांनी पिछाडी आहेत. दिंडोरी मतदारसंघातून भास्कर भगरे ११ हजार ८९१ मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीच्या डॉ.भारती पवार पिछाडीवर आहेत. यवतमाळमध्ये-वाशिम मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संजय देशमुख १८ हजार ४६७ मतांनी आघाडीवर आहेत. तर राजश्री पाटील पिछाडी आहेत.

धाराशीवमधील महाआघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर २८ हजार ३४ मतांनी आघाडीवर आहेत. तर अर्चना पाटील पिछाडीवर आहेत. बुलढाणा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव ४ हजार ९२७ मतांनी आघाडीवर आहेत. तर नरेंद्र खेडकर पिछाडी आहेत. वर्ध्यातून महायुतीचे रामदास तडस आणि महाआघाडीचे अमर काळे यांच्या चुरशीची लढत रंगली आहे. तडस ७३१ मतांनी आघाडीवर आहेत.

लातूर मतदारसंघातून महाआघाडीचे शिवाजी कळगे ५ हजार ७७ मतांनी आघाडीवर तर सुधाकर श्रगारे पिछाडीवर आहेत. तर अकोला मतदारसंघात महाआघाडीचे अभय पाटील २ हजार ५७६ मतांनी आघाडीवर आहेत. नागपूरमधून नितीन गडकरी १८ हजार ५२१ मतांनी आघाडीवर आहेत. सांगलीमधून अपक्ष विशाल पाटील १२ हजार ९५८ मतांनी आघाडीवर आहेत. तर संजय पाटील पिछाडीवर आहेत. कोल्हापूरमधील महाआघाडीचे छत्रपती शाहू महाराज १५ हजार १२ मतांनी आघाडीवर आहेत. तर संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. हतकणंगलेमध्ये महाआघाडीचे सत्यजीत पाटील यांनी धैर्यशील माने यांना पिछाडीवर टाकत ३ हजार ८१८ मतांनी आघाडी मिळवली आहे.

आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार एनडीएच्या ४०० पारला ब्रेक लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. एनडीए आणि इंडियामध्ये लढत चुरशीची होईल, असं चित्र दिसत आहे. आत्तापर्यंतच्या कलानुसार राज्यात मात्र महाआघाडीचं पारडं जड आहे. तर महायुतीला ब्रेक लागल्याचं दिसतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

SCROLL FOR NEXT