Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. ४) जाहीर होत असून तमाम देशवासियांचे आणि इतर देशांचेही लक्ष या निकालाकडे लागले आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionAgrowon

Lok Sabha Vote Counting 2024 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. ४) जाहीर होत असून तमाम देशवासियांचे आणि इतर देशांचेही लक्ष या निकालाकडे लागले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्‌ट्रिक साधणार की ‘इंडिया’ आघाडीचे सत्तेत येण्याचे स्वप्न साकार होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

अठराव्या लोकसभेसाठी देशात सात टप्प्यांत मतदान झाले. यातील उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये प्रत्येक टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत मतदान पार पडले होते. मतदानानंतर बहुतांश सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केलेल्या कलचाचणीमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मात्र, हे अंदाज फोल ठरतील आणि इंडिया आघाडी सत्ता काबीज करेल, असा विश्वास काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आणि ‘ईव्हीएम’मध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.

Lok Sabha Election
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे आज अंतिम टप्प्यातील मतदान

निकालाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. तर, ‘ईव्हीएम’च्या सील तोडल्याचे आढळून आले तर त्याची तत्काळ तक्रार करावी, असे निर्देश भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. लोकसभेबरोबरच ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे.

Lok Sabha Election
Lok Sabha Election : पुणे जिल्ह्यात मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

निकाल जाहीर होण्यास काही तास बाकी असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यता लक्षात घेऊन भाजपने जल्लोषाची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये रालोआला ३५० च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला १२५ ते १६० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com