Junnar Market Committee Results
Junnar Market Committee Results Agrowon
ॲग्रो विशेष

Junnar Market Committee Results : जुन्नर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

Team Agrowon

नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकार पॅनेलने अठरापैकी १३ जागा जिंकून बाजार समितीची सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.

भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे दोन्ही गट व बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलला पाच जागा मिळाल्या.

निकाल दृष्टिक्षेपात येताच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भांडाऱ्याची उधळण करत, शिवनेर सहकार पॅनेलचे प्रमुख, जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा बँकेचे संचालक व पॅनेल प्रमुख संजय शिवाजीराव काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर सहकार पॅनेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजप नेत्या आशा बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माउली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आले होते.

विजयी उमेदवार

शिवनेर सहकार पॅनेल : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गट : संजय काळे, निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे, पांडुरंग गाडगे, नबाजी घाडगे, आरती वारुळे, विमल तळपे, तुषार थोरात, धोंडीभाऊ पिंगट

ग्रामपंचायत मतदार संघ : प्रीतम काळे

व्यापारी अडते मतदार संघ गट : सारंग घोलप, धनेश संचेती

हमाल तोलरी गट : जितेंद्र कासार

शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघ : ज्ञानेश्‍वर खंडागळे, संतोष चव्हाण.

ग्रामपंचायत मतदार संघ : प्रियांका शेळके, भास्कर गाडगे, जनार्दन मरभळ

विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केली. मात्र शेतकरी मतदार सुज्ञ आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय, केलेली विकासकामे याला साथ दिली. आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी भक्कम साथ दिली. आमचे काही उमेदवार अल्पमतांनी पराभूत झाले. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल.
संजय काळे, शिवनेर सहकार पॅनेल प्रमुख
सर्व विरोधक एकत्र येऊन सुद्धा त्यांना बहुमत मिळाले नाही. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असल्याचे मतदारांनी निकालातून दाखवले आहे. महाविकास आघाडी झाली असती, तर आनंद झाला असता. पुढील निवडणुका महाविकास आघाडी करून लढवण्याचा प्रयत्न राहील.
आमदार अतुल बेनके
माझा उमेदवारी अर्ज बाद झाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते. बाजार समिती परिवर्तन होणार अशी तालुक्यात चर्चा होती. मात्र थोड्या मतांनी आमचे काही उमेदवार पराभूत झाले. मोठ्या प्रमाणात मते बाद झाली. आमचे निवडून आलेले पाच उमेदवार सक्षम असून, बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतील.
रघुनाथ लेंडे, माजी सभापती आणि शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल प्रमुख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT