Parbhani APMC Election : ‘महाविकास’चा दबदबा कायम, भाजपच्या मनसुब्यावर पाणी

परभणी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकजुटीने सरस कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
APMC Election Parbhani
APMC Election Parbhani Agrowon

Parbhani Election Result : परभणी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकजुटीने सरस कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या चार बाजार समित्यातींल दबदबा महाविकास आघाडीने कायम राखला. परिणामी भारतीय जनता पक्ष युतीच्या या बाजार समित्यांतील सत्ता हस्तगत करण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नेता एकवटले.

त्यांनी बाजार समिती बचाव, शेतकरी बचाव पॅनेलद्वारे परिवर्तनाची हाक दिली. परंतु महाविकास आघाडीच्या मात्तबर, मुरब्बी नेतेमंडळींच्या खेळीपुढे भाजपायुतीचा टिकाव लागला नाही.

APMC Election Parbhani
Nagar APMC Election : नगरला नेत्यांनी आपापल्या सत्ता राखल्या

माजी सभापती समशेर वरपुडकर हे पराभूत झाले. महाविकास आघाडीचे माजी सभापती गणेश घाटगे, पंढरीनाथ घुले, अरविंद देशमुख, गंगाप्रसाद आणेराव, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, सुरेश घुमरे यांचा तर अपक्षात जिल्हा बियाणे, खते, किटकनाशके व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश देशमुख यांचा विजयी उमेदवारात समावेश आहे.

APMC Election Parbhani
APMC Election Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीत सत्ताधारी गटाची बाजी

जिंतूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डाकर साकोरे यांना विधान सभा मतदार संघातील जिंतूर व बोरी मध्ये अपेक्षेनुसार स्पष्ट बहुमत मिळाले. परंतु सेलू बाजार समितीतील सत्ता गमवावी लागली.

राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांना घटक पक्षांच्या मदतीने सेलू बाजार समितीतील सत्ता हस्तगत करण्यात मोठे यश मिळाले. सहकार क्षेत्रातील राजकारणातील वर्षानुवर्षे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची मक्तेदारी मोडून काढण्यात भांबळे यांना यश मिळाले आहे.

APMC Election Parbhani
APMC Election Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीत सत्ताधारी गटाची बाजी

विशेष ग्रामपंचायत मतदारसंघात भांबळे समर्थकांची कामगिरी सरस राहिली. गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनेल गंगाखेड व पूर्णा बाजार समित्यांमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

गंगाखेड बाजार समितीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, सीताराम घनदाट यांच्या तर पूर्णा बाजार समितीत शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख विशाल कदम, बालाजी देसाई, राष्ट्रवादीचे शहाजी देसाई यांच्या एकीमुळे महाविकास आघाडीला यश मिळाले. आमदार गुट्टेच्या वर्चस्वाला सुरंग लावला.

बाजार समिती स्थिती...

परभणी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 7 पैकी परभणी, सेलू, गंगाखेड, पूर्णा या 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सत्ता महाविकास आघाडीने काबीज केली. भाजपला केवळ जिंतूर, बोरी 2 बाजार समित्यांवर समाधान मानावे लागले. ताडकळस बाजार समितीत भाजपला सर्वाधिक 9 जागा मिळाल्या तर कॉंग्रेसला 6 व राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्याने त्रिशंकू अवस्था झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com