Sharad Pawar On EVM Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : 'माझ्या हातात पुरावा नाही, पण आज ना उद्या याचे परिणाम दिसतील'; शरद पवार यांचे ईव्हीएमवर पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महाविकास आगाडीसह मनसे आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : ईव्हीएममध्ये मतदानाच्या टक्केवारीतील घोळावरून जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा (ता.३०) तिसरा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला. तसेच आढाव यांच्या आंदोलनाला सर्वसामान्य जनतेनं पाठिंबा देऊन, जागृती आणि उठावात सहभागी होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्याकडे ईव्हीएमबाबत सध्या पुरावा नाही, पण आज ना उद्या याचे परिणाम लोकांना दिसतील, अशीही प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी आढाव यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उपोषणस्थळी जाऊन भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, झालेल्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याचा आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. तर लोकांनीच ईव्हीएम वर संशय देखील व्यक्त केल्याचे शरद पवार म्हणाले.

फेर मतमोजणीसाठी काही उमेदवारांनी पैसे भरले असून मजमोजणी दरम्यान काही मते सेट केल्याचा दावा करण्यात आला आहे. पण याबाबत माझ्याकडे पुरावा नसून लोकांनी तसा दावा केला आहे. याबाबच काही लोकांकडून आमच्याकडे प्रेझेंटेशन देखील केले होते.

पण आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. आमचा विश्वास निवडणूक आयोगावर होता. आयोग चुकीची भूमिका घेईल, असा गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. मात्र आता निकालानंतर या शंकांमध्ये काहीतरी तथ्य असल्याचे दिसत असल्याचेही शरद पवार म्हणाले.

तसेच शरद पवार यांनी फेरमतमोजणीतून काही फारसे समोर येईल, असे वाटत नसून यातही आता शंका वाटत आहे. तर शेवटच्या दोन तासात ७ टक्क्याच्या वर मतदान झाल्याची आकडेवारीही धक्कादायक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

व्यवस्था आणि पारदर्शकतेवर शंका : नाना पटोले

ईव्हीएममध्ये मतदानाच्या टक्केवारीत घोळ असल्यावरून राज्यातील महाविकास आघाडीसह इतर पक्षांनी तक्रारींचा सुर आळवला आहे. तर महायुतीचे सरकार लोकांच्या मतांवर नाही, तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आले आहे. यामुळे माझा ईव्हीएमवर संशय नसून तो निवडणून आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे. आमची शंका आयोगाची व्यवस्था आणि पारदर्शकतेवर असल्याचे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT