Sharad Pawar : ईव्हीएम, पैशाने आमचा घात केला

Maharashtra Politics : विजयाची खात्री असूनही केवळ ईव्हीएममुळे आमचा घात आला, पैशांचा बेसुमार वापर करून आमचा पराभव केल्याची भावना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पराभूत आणि विजयी आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्या.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : विजयाची खात्री असूनही केवळ ईव्हीएममुळे आमचा घात आला, पैशांचा बेसुमार वापर करून आमचा पराभव केल्याची भावना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पराभूत आणि विजयी आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्या.

अनेक मतदार संघांतील आकडेवारी पाहता हे ईव्हीएम घोटाळ्याशिवाय शक्य नाही, यावर देशपातळीवर आंदोलन उभे करावे लागेल, अशी मागणीही त्यांनी केली. यावर कायदेशीर लढाई लढू, असे पवार यांनी सांगितल्याचे उमेदवारांनी सांगितले.

Sharad Pawar
Sharad Pawar : ‘लाडकी बहीण योजने’बाबत ‘मविआ’विरोधात खोटा प्रचार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी आजी- माजी आमदारांची बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. अडीच तासांहून अधिक काळ सर्व आजी -माजी आमदारांचे म्हणणे पवार यांनी ऐकून घेतले. उमेदवारांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम घोटाळा आणि पैसे वाटपावर फोडले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ८६ उमेदवार रिंगणात होते. अजित पवार गटाचे ५९ उमेदवार रिंगणात होते. शरद पवार गटाचे केवळ १० उमेदवार निवडून आले. तर अजित पवार गटाचे ४१ उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीत सर्वाधिक नुकसान शरद पवार गटाचे झाले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

यावर विचारमंथन करण्यासाठी सर्व उमेदवारांची बैठक बोलविली. या बैठकीत पराभूत आणि विजयी उमेदवारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला. तसेच मतदार संघात भरपूर पैसे वाटप केल्याने वातावरण फिरले आणि पराभवाला सामोरे जावे लागले.

यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभा करण्याची गरज असल्याचे मत काही उमेदवारांनी व्यक्त केले. पवार यांनी या भावना ऐकून घेतल्यानंतर ईव्हीएमबाबत कायदेशीर लढाई लढावी लागेल. ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींवर न्यायालयात दाद मागू, त्यासाठी वकिलांची फौज उभी करू, असे सांगितल्याचे एका उमेदवाराने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com