Ajit pawar Meets Sharad Pawar in Delhi  Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : मंत्रिमंडळविस्तार लवकरच!, अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनासह मंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही सांगितली

Ajit Pawar meets Sharad Pawar Delh : राज्यातील महायुती सरकार सत्तेवर येऊन आठवडा होत आहे. मात्र अद्याप खाते वाटपाचा पेच सुटलेला नाही. यातच आता हिवाळी अधिवेशन जवळ आले असून मंत्रिमंडळविस्तार लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यासह देशाचे लक्ष आता महायुतीच्या मंत्रिमंडळविस्ताराकडे लागले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळविस्तारासह हिवाळी अधिवेशनाची तारीखेची शक्यता वर्तवली आहे. अजित पवार दिल्लीत जेष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. यामुळे अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. ही भेट शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी झाली. यावेळी पार्थ पवार, अजित पवार गटाचे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते. तर पक्षफुटीनंतर काका-पुतण्याची पहिलीची भेट होत असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

मंत्रीमंडळ विस्तार 'या' तारखेला

यावेळी अजित पवार यांनी, सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत शक्यता व्यक्त करताना, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. तर खाते वाटपाबाबत आमच्या तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत.

आता १६ तारखेपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यामुळे राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार आहे. सध्या मुख्यमंत्री आणि आम्ही दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला आहे. आता पहिला मंत्रीमंडळ विस्तार बहुतेक १४ तारखेला होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, खातेवाटपाबाबत अनेक अंदाज समोर आले असून भाजपचे २०, एकनाथ शिंदे यांचे १३ आणि अजित पवार गटाचे १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर याचबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्याची चर्चा रंगली आहे. पण एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा टाळल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

शरद पवार यांना शुभेच्छा

जेष्ठ नेते शरद पवार यांचा आज ८५ वाढदिवस असल्याने अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, आज साहेबांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली. साहेबांचे दर्शन घेतले, ही कौटुंबिक भेट होती. याच हेतूने आम्ही सगळे आलो असल्याचे अजित पवार म्हणाले.

यशवंतराव चव्हाण यांची शिकवण

तसेच अजित पवार यांनी, या भेटीत नेहमी प्रमाणे चर्चा झाली. परभणी हिंचासार, राज्यसभा आणि महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाली. पण राजकारणात फक्त टीकाच करायची नसते. आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी सस्कृती असून यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया घातला आहे. त्यांनी याची शिकवण दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही राजकारण करण्याच्या प्रयत्न करत आहोत, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

१०० टक्के कौटुंबिक भेट

दरम्यान या भेटीवर पुतणे युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजोबांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांना भेटायला मी जातो. आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो. यावेळी काका अजित पवार कुटुंबासह आले होते. ते येतील याची माहिती नव्हती. पण आमचे कौटुंबिक संबंध वेगळे आहेत. ते साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने भेटले. माझा भाऊही आला होता. ही भेट १०० टक्के कौटुंबिक होती, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT