Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Recovery : आदेशानंतरही कर्ज फेडण्यास केन ॲग्रोची टाळाटाळ

Loan Repayment : राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) आदेशानुसार केन ॲग्रो एनर्जी, लि. रायगाव कंपनीने जिल्हा बँकेकडील थकित कर्जापोटी ८ एप्रिल २०२५ पर्यंत १८ कोटींचा पहिला हप्ता भरणे आवश्यक होते.

Team Agrowon

Sangli News : राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) आदेशानुसार केन ॲग्रो एनर्जी, लि. रायगाव कंपनीने जिल्हा बँकेकडील थकित कर्जापोटी ८ एप्रिल २०२५ पर्यंत १८ कोटींचा पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. मात्र ही रक्कम भरण्यास कंपनीने टाळाटाळ केली आहे.

याप्रकरणी रिझोल्यूशन प्रोफेशनल (व्यावसायिक) रितेश महाजन यांनी नुकतीच ऑनलाइन बैठक घेतील. या वेळी केन ॲग्रोची कान उघडणी करत थकवलेला पहिलाच हप्ता आता १० मे पर्यंत आठ टक्के व्याजासह भरण्यास सांगितले आहे. यामुळे केन ॲग्रोला लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे.

केन ॲग्रोला जिल्हा बॅँकेने साखर कारखान्यासाठी दिलेले कर्ज थकित गेले आहे. या कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) सादर करण्यात आलेला रिझोल्यूशन प्लॅन (वसुली प्लॅन) मंजूर झाला आहे. त्यानुसार पुढील सात वर्षांत केंन ॲग्रोनेही रक्कम फेडायची आहे. केन ॲग्रो, रायगाव शुगर्स व जिल्हा बॅँकेच्या समझोत्यानुसार एनसीएलटीने हा प्लॅन मंजूर केला आहे.

त्यानुसार सात वर्षांत जिल्हा बॅँकेच्या थकित कर्जाचे व्याजासह २२५ कोटी रुपये फेडायचे आहे. यातील १६० कोटी रुपये मुद्दल आहे. या प्लॅन नुसार केन ॲग्रोने एनसीएलटीचा निकाल लागल्यानंतर पंधरा दिवासांत जिल्हा बॅँकेच्या थकित कर्जापोटी १८ कोटींचा पहिला हप्ता भरणे आवश्यक होते.

८ एप्रिल २०२५ पर्यंत याची मुदत होती. बॅँकेने सतत पाठपुरावा करूनही केन ॲग्रोने ही रक्कम मुदतीत भरली नाहीत. अखेर याप्रकरणी बॅँकेने रिझोल्यूशन प्रोफेशनल (व्यावसायिक) रितेश महाजन यांना कळवले. महाजन यांनी नुकतीच याप्रकरणी ऑनलाइन मीटिंग घेतली. यात महाजन, केन ॲग्राचे प्रतिनिधी व जिल्हा बॅँकेसह या कारखान्याकडील अन्य कर्जदार बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एनसीएलटीच्या आदेशानुसार केन ॲग्रो कंपनीने जिल्हा बँकेच्या थकित कर्जापोटी १८ कोटींचा पहिला हप्ता ८ एप्रिल २०२५ पर्यंत भरणे आवश्यक होते. त्यांनी आजपर्यंत ही रक्कम भरलेली नाही. कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशन यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत याप्रकरणी कंपनीवर आठ टक्के व्याजाची कारवाई केली आहे. केन ॲग्रोला व्याजासह हे १८ कोटी रुपये भरण्यास १० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT