Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : नाझरे धरणक्षेत्रात सर्वाधिक २०६ मिलिमीटर पावसाची नोंद

Rain News : जून महिन्यात पावसाचे जवळपास वीस दिवस लोटले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार, तर काही ठिकाणी कमी पाऊस पडला.

Team Agrowon

Pune News : जून महिन्यात पावसाचे जवळपास वीस दिवस लोटले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार, तर काही ठिकाणी कमी पाऊस पडला. पूर्व भागातील पावसाचा जोर अधिक होता.

यामध्ये नाझरे धरण क्षेत्रात सर्वाधिक २०६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक घटली आहे. गुरुवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत ०.४७ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

आतापर्यंत धरणात नव्याने एकूण १२.२६ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांत उपयुक्त पाणीसाठा १४.६० टीएमसी म्हणजेच सात टक्के एवढा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांत १६.३७ टीएमसी म्हणजेच ८ टक्के एवढा पाणीसाठा होता.

यंदा साधारणपणे सात जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक होता. काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता.

यात मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणांत नव्याने आवक सुरू झाली होती.

नीरा आणि भीमा नदीच्या कार्यक्षेत्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात उजनी धरणक्षेत्रात १४४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उजनी धरणात सर्वाधिक पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत उजनीत ७.४३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

यामुळे उजनीतील पाणीसाठा उणे २४.७१ टीएमसी म्हणजेच उणे ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात धरणांत दररोज अर्धा ते पाऊण टीएमसी पाण्याची आवक झाली होती.

एक ते २० जून या कालावधीत धरणनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

टेमघर १५४, वरसगाव १०६, पानशेत १०४, खडकवासला ९६, पवना ११७, कासारसाई ५८, कळमोडी ७२, चासकमान ११२, भामा आसखेड ४४, आंध्रा ३९, वडीवळे ५२, नाझरे २०६, गुंजवणी १२८, भाटघर १३१, निरा देवघर ८८, वीर १२१, पिंपळगाव जोगे २४, माणिकडोह ५३, येडगाव १५३, वडज ३३, डिंभे ८५, चिल्हेवाडी २१, घोड १९८, विसापूर १०३, उजनी १४४, मुळशी ९२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT