Parbhani News : यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील बँकांनी शनिवार (ता. ३१) पर्यंत ७७ हजार ९७७ शेतकऱ्यांना ६२९ कोटी २४ लाख रुपये (४२.७८ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. यंदा ऑगस्ट अखेरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँका तसेच खासगी बँकांनी पीक कर्जवाटपात हात अखडता घेतल्याचे दिसत आहे.
या बँकांनी अनुक्रमे २१.७४ टक्के व १९.६२ टक्के उद्दिष्ट साध्य केले असून, सप्टेंबरअखेर उद्दिष्टपूर्तीसाठी वाटपाची गती वाढवावी लागेल. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९६.६२ टक्के, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०३.६९ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
यंदा खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी मिळून एकूण १७ बँकांना १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) मिळून एकूण ९४७ कोटी ८८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २२७ कोटी ३९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९४ लाख रुपये, खासगी बँकांना १२२ कोटी ७६ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.
शनिवार (ता. ३१) पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १७ हजार ९४५ शेतकऱ्यांना २०६ कोटी ११ लाख रुपये पीककर्ज वाटप करून २१.७४ टक्के उद्दिष्ट साध्य केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २१ हजार १७८ शेतकऱ्यांना २१९ कोटी ७१ लाख रुपये पीककर्ज वाटप करत ९६.६२ टक्के उद्दिष्ट साध्य केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३७ हजार ५३२ शेतकऱ्यांना १७९ कोटी ३३ लाख रुपये पीककर्ज वितरित करून १०३.६९ टक्के उद्दिष्ट साध्य केले.
खासगी बँकांनी १ हजार ३२२ शेतकऱ्यांना २४ कोटी ९ लाख रुपये पीककर्ज वाटून १९.६२ टक्के उद्दिष्ट साध्य केले. ऑगस्टअखेरपर्यंतच्या पीककर्जवाटपात ६ हजार ७९३ शेतकऱ्यांना ७७ कोटी ९४ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. तर ७१ हजार १८४ शेतकऱ्यांनी ५५१ कोटी १३० लाख रुपये रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. गतवर्षी (२०२३) ३१ ऑगस्ट पर्यंत एकूण ९३ हजार २१७ शेतकऱ्यांना ७३८ कोटी ३० लाख रुपये पीककर्ज वाटप करून ५३.३४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले होते.
परभणी जिल्हा पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)
बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या
भारतीय स्टेट बँक ६०७.७० १६०.८८ २६.४७ १४२३१
महाराष्ट्र ग्रामीण बँक २२७.३९ २१९.७१ ९६.६२ २११७८
जिल्हा सहकारी बँक १७२.९४ १७९.३३ १०३.६९ ३७५३२
बँक ऑफ बडोदा ६९.७७ ४.७९ ६.९७ ५५१
बँक ऑफ इंडिया १२.५० ०.५३ ४.२४ ६९
बँक ऑफ महाराष्ट्रा ८५.५७ १८.०३ २१.०७ १३५९
कॅनरा बँक ५०.१४ २.१८ ४.३५ ३८७
सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.८३ २.८८ २२.४५ २४२
इंडियन बँक २५.५५ १.३५ ५.२८ १२७
इंडियन ओव्हरसीज बँक ११.०१ १.६२ १४.७१ १२९
पंजाब नॅशनल बँक ११.४९ ०.६४ ५.५७ ४८
युको बँक २५.०६ २.७९ ११.१३ ३०८
युनियन बँक ऑफ इंडिया ३६.२६ १०.४२ २८.७४ ४९४
अॅक्सिस बँक १३.२६ २.५१ १८.९३ ८
एचडीएफसी बँक ४०.४८ ८.३१ २०.५३ ४२३
आयसीआयसीआय बँक ३१.९५ ११.०७ ३४.६५ ६७०
आयडीबीआय बँक ३७.०७ २.२० ५.९३ २२१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.