Crop Loan : मराठवाड्यात खरिपासाठी उद्दिष्टाच्या ५९ टक्केच कर्जपुरवठा

Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ऑगस्टच्या माध्यान्हपर्यंत ५९ टक्केच कर्जपुरवठा झाला.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ऑगस्टच्या माध्यान्हपर्यंत ५९ टक्केच कर्जपुरवठा झाला. थकीत असलेले कर्ज, तसेच कर्ज नव-जुने करण्याला मिळत नसलेला प्रतिसाद, यामुळे हंगाम कालावधी निम्म्यापेक्षा जास्त आटोपला तरी कर्ज पुरवठ्याचा गणित मार्गी लावणे सुरूच असल्याची स्थिती आहे.

माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बारा हजार ७४६ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट सर्व बँकांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात ७५२३ कोटी ३४ लाख रुपये कर्ज पुरवठा करत सर्वच आठही जिल्ह्यांनी मिळून सरासरी ५९ टक्केच कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केल्याची स्थिती आहे. जालना, परभणी सारखे जिल्हे कर्जपुरवठ्यात मराठवाड्यात सर्वात पिछाडीवर आहेत.

लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांनी कर्ज पुरवठ्यात बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ बीड, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांचा कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्ट पूर्तीत क्रमांक येतो. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वेळेत व गरजेनुसार कर्ज पुरवठा करण्यात शासनाची व्यवस्था कुचकामी ठरल्याची स्थिती आहे. थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज द्यावे कसे हा प्रश्न बँकांसमोर असून शासन फक्त कर्ज पुरवठा उद्दिष्ट प्रमाणे करण्याचाच विषय समोर करत असल्याची स्थिती आहे.

Crop Loan
Crop Loan Distribution : खरिपातील पीककर्ज वाटपास गती

जिल्हानिहाय कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट व पूर्ती (१५ ऑगस्टपर्यंत)

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

उद्दिष्ट १५५९ कोटी ३८ लाख

प्रत्यक्ष पुरवठा १०७३ कोटी ८६ लाख

टक्केवारी ६९

जिल्हा : बीड

उद्दिष्ट १७०६ कोटी ९५ लाख

प्रत्यक्ष पुरवठा १०५४ कोटी ७ लाख

टक्केवारी ६२

Crop Loan
Crop Loan : व्यवस्था बदलाने वाढेल पीककर्ज टक्का

जिल्हा : हिंगोली

उद्दिष्ट ८९१ कोटी ७६ लाख

प्रत्यक्ष पुरवठा ४५५ कोटी ८१ लाख

टक्केवारी ५१

जिल्हा : जालना

उद्दिष्ट १३०८ कोटी

प्रत्यक्ष पुरवठा ५६५ कोटी ७६ लाख

टक्केवारी ४३

जिल्हा : लातूर

उद्दिष्ट २३९९ कोटी ९९ लाख

प्रत्यक्ष पुरवठा १६५८ कोटी ७ लाख

टक्केवारी ६९

जिल्हा : नांदेड

उद्दिष्ट १८२५ कोटी ७८ लाख

प्रत्यक्ष पुरवठा १२२०७ कोटी ८५ लाख

टक्केवारी ६६

जिल्हा : धाराशिव

उद्दिष्ट १५८३ कोटी ७७ लाख

प्रत्यक्ष पुरवठा ८६५ कोटी २२ लाख

टक्केवारी ५५

जिल्हा : परभणी

उद्दिष्ट १४७० कोटी ९९ लाख

प्रत्यक्ष पुरवठा...६४२ कोटी ७० लाख

टक्केवारी ४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com