Maharashtra Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्प पुरवणी मागणीवरून जयंत पाटलांचा टोला; अजित पवारांचा पलटवार

Monsoon session 2024 : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. त्यांनी २० हजार कोटी तुटीचा अर्थ संकल्प मांडला. यावेळी ९४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यावरून जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून मंगळवारी (ता.०९) अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. अजित पवार यांनी २० हजार कोटींच्या तुटीचा अर्थ संकल्प मांडल्यानंतर ९४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या देखील सभागृहासमोर ठेवल्या. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करताना जोरदार टोलेबाजी केली. तसेच अजित पवार यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी, राज्याच्या तुटीचा अर्थ संकल्प २० हजार कोटी रुपयांचा असताना जवळजवळ १ लाखांच्या घरात पुरवणी मागण्या ठेवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी ९४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या महसूली तूटीत वाढ होणार आहे. तसेच जीडीएसपीचा विचार केला तर जवळपास १ लाख २० हजार कोटी रूपयांची तूट निर्माण करणारी आहे. तर ती केंद्र सरकारच्या निर्धारीत ३.५० टक्क्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे राज्याच्या रेटींग रेट कमी होऊन व्याजाची टक्केवारी वाढेल. नव्याने कर्ज काढावे लागेल असे जयंत पाटील यांनी सांगितले.

तसेच पुरवण्या मागणीवरून अजित पवार यांच्यावर टीका करताना, याआधी अजित पवार यांनी अशी चूक कधीच केली नाही. त्यांनी ९ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र असे कधीच झाले नाही. मग १० व्यांदा अर्थसंकल्प सादर करताना अशी चूक का करता असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच अजित पवार यांना ही चूक महायुतीतील नेत्यांमुळे करावी लागत आहे. त्यांच्यामुळे अजित पवार यांच्यावर ही वेळ आल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तर सभागृहात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्या मान्य करू नयेत, अशी मागणी सभागृहाकडे पाटील यांनी केली.

अजित पवारांचा पलटवार

अजित पवार यांनी देखील जयंत पाटलांच्या टोल्याला पलटवार करताना, देशात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्यानंतर जयंत पाटील आहेत. त्यामुळे यातील बारकावे त्यांना माहित आहेत. तरिही मी सभागृहाला सांगू इच्छितो की, आर्थिक विषयात कोणतीही मर्यादा न ओलांडता यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. नेहमी प्रमाणे यंदाही तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना दोन वर्ष शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यानंतर कोणताही अर्थसंकल्प शिलकीचा नाही. त्यामुळे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच मांडण्यात आल्या आहेत. त्याच प्राध्यान्याने ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकाला तडा जाईल असे वक्तव्य कोणीही करू नये, असं अजित पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT