Pune News : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा रविवारी (ता.१९) हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. यानंतर घातपाताच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान रईसी यांच्या अपघाती निधनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला होता. तसेच आपण इराणच्या मागे उभे राहू असे म्हटले होते. यानंतर मंगळवारी देशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रपती भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात आला आहे. हेलिकॉप्टर अपघातात रईसी यांच्यासह ९ जणांचा मृत्यू झाला होता. यावरून इराणवर शोककळा पसरलेली आहे.
रईसी यांच्यासह ९ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू रविवारी झाला. यानंतर अनेक देशांच्या प्रमुखांनी निधनावर शोक व्यक्त करताना दुख जाहीर केले. दरम्यान रईसी आणि इतरांच्या दुःखद निधनानंतर, भारताने मंगळवारी राष्ट्रीय शोक जाहीर करणारे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
यात म्हटले आहे की, “भारत सरकारने महामहिमांच्या सन्मानार्थ २१ मे २०२४ रोजी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे,” डॉ. सय्यद इब्राहिम रईसी, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाले.
यात पुढे म्हटले आहे की, रईसी आणि इतरांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमिवर देशातील राष्ट्रीय ध्वज असणाऱ्या सर्व इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविला जाईल. तसेच कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम केले जाणार नाहीत.
याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रईसी यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला होता. यात पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्र्यांनी भारत-इराण संबंध मजबूत करण्यात रईसी यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची नोंद घेतली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.