National Conference  Agrowon
ॲग्रो विशेष

National Conference : शेतकरी संघटनांची दिल्लीत सोमवारपासून राष्ट्रीय परिषद

Delhi National Conference : भारतीय किसान संघासह (सिफा) देशभरातील विविध शेतकरी संघटनांची राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे सोमवारपासून (ता. ५) सुरू होत आहे.

Team Agrowon

Sangli News : भारतीय किसान संघासह (सिफा) देशभरातील विविध शेतकरी संघटनांची राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे सोमवारपासून (ता. ५) सुरू होत आहे. आंध्र प्रदेश भवनमध्ये ती तीन दिवस चालणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे, की भारतीय किसान संघ-परिसंघाचे (सिफा) राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पाटील, मुख्य सल्लागार पी. चेंगल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे. परिषदेत देशातील शेती आणि शेतकरी समृद्ध होण्याकरिता आगामी १० वर्षांची धोरणे ठरवण्याबाबत चर्चा होऊन अजेंडा ठरेल.

पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याबाबत उपाययोजना राबवणे, जागतिकीकरण आणि भारतीय शेती, पीकविमा, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, शेतीसंलग्न संस्थांचे एकत्रिकरण (सीएसीपी, एफसीआय, नाबार्ड, आयसीएआर), शेतीमाल प्रक्रिया व निर्यात वाढवणे, साखर कारखानदारीबाबत मुक्त धोरण यामध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्यातून साखर वगळणे, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करणे, देशातील २५३ बंद कारखाने सुरू करणे, इथेनॉलबाबत सरकारचे धोरण, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करणे, बाजार समितीने नियमनमुक्त व्हावी, यांसह अन्य विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

परिषद कालावधीत विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यात येणार असून त्यांना ‘सिफा’च्या वतीने तयार केलेला अजेंडा लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणार आहे.

या परिषदेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, नवी दिल्ली, हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, जम्मू-काश्मीरमधील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT