Raju Shetti : हातकणंगले लोकसभा स्वतंत्रपणे लढणार ः राजू शेट्टी

Loksabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रचाराचा नारळ फोडला.
Raju Shetti
Raju Shetti Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेशी हातमिळवणी न करता स्वतंत्रपणे खासदारकी लढवण्याचे जाहीर केले आणि राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

मकर संक्रांतीनिमित्त येथील वेदभवनमध्ये आयोजित केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ अशा शुभेच्छा देत शेट्टी यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला.

Raju Shetti
Raju Shetti vs Jayant Patil : राजारामबापू कारखान्यावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा

माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘राज्यात राजकीय पक्ष फुटत आहेत. ज्यांच्याकडे न्याय मागायचा त्यांच्याकडून पारदर्शक न्याय मिळत नाही. सगळेच पात्र ठरत असतील तर मग मतदार अपात्र का, असा सवाल उपस्थित होत आहे. न्यायव्यवस्था मरगळलेली असताना विरोधक व सत्ताधारी सगळेच मळकट झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून राज्यासह देशभरातील ऊस दरवाढीसह खतांच्या किमती, वाढती महागाई, शिक्षणाचे खासगीकरण, वीजदर वाढ, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर बोलण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल.

Raju Shetti
Raju Shetti : महानंद हस्तांतरावरून राज्य सरकारवर शेट्टींची टीका

जे अशक्य आहे ते शक्य करण्यात स्वाभिमानीचा हातखंडा आहे. यामुळेच तुटलेल्या उसासाठी ३७ कारखानदारांकडून १५ लाख ऊस उत्पादकांच्या घरी सुमारे ३०० कोटी पोहोचवले. ऊस आंदोलनामुळे ऊस तोडणी लांबल्या, रिकव्हरी कमी होणार अशी कोल्हेकुई करणाऱ्यांची बोलती बंद झाली,’’ असेही ते म्हणाले.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, पुरंदर पाटील, विकास चौगुले आदींची भाषणे झाली. या वेळी सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, बसगोंडा बिरादार, सागर शंभूशेटे, सौरभ शेट्टी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com