Nashik News : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे ‘हरित कुंभ’ संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण उपक्रम बुधवारी (ता.१६) राबविण्यात आला. या उपक्रमात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत जिल्हाभरात तब्बल १ लाख ८८ हजार २२३ वृक्षांचे रोपण केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
यंदाचा कुंभ ‘हरित कुंभ’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प घेत ‘माझा कुंभ माझी जबाबदारी’ आणि ‘माझा वृक्ष माझी जबाबदारी’ या घोषणांवर आधारित वृक्षारोपण उपक्रम जिल्हाभरात एकाच दिवशी राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या ४५ विभागांनी सहभाग नोंदविला. त्यांना एकूण १ लाख ८० हजार ६०५ वृक्षांचे रोपण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यात भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यामध्ये जिल्हा परिषदेने ६७ हजार २३० वृक्षांचे रोपण करून आघाडी घेतली. त्याखालोखाल उपवनसंरक्षक (पूर्व) यांनी ४३ हजार २७०, उपवनसंरक्षक (पश्चिम) यांनी २० हजार ९५०, महसूल विभागाने १२ हजार १७८ आणि वनविकास महामंडळाने १० हजार वृक्षांचे रोपण केले. एकूण ४५ शासकीय विभागांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपणात योगदान दिले.
जिल्हा परिषदेकडून सर्वाधिक वृक्ष लागवड
वृक्षारोपण उपक्रमात भारतीय प्रजातीचे वड, उंबर, पिंपळ, आंबा, चिंच, पळस अशी विविध प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हा परिषदेने सर्वाधिक ६७ हजार २३० वृक्षांची लागवड केली आहे.
त्याखालोखाल उपवनसंरक्षक पूर्व तसेच पश्चिम यांनी अनुक्रमे ४३२७० व २०९५०,महसुल विभाग १२१७८ तसेच वनविकास महामंडळाने १० हजार वृक्षांचे रोपण केले.या उपक्रमात ४५ विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यातील १० विभागांनी १००० ते कमाल ६७ हजार वृक्ष लागवड केली. तर ३५ १००० हून कमी म्हणजेच किमान २० पर्यंत लागवड केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.