Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC : नाशिक बाजार समितीकडून सुरक्षारक्षकांच्या अनावश्यक खर्चाला कात्री

APMC News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेवर आलेल्या नव्या व्यवस्थापनाने अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेवर आलेल्या नव्या व्यवस्थापनाने अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. तत्कालीन सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात बाजार समितीमध्ये ३५ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.

त्यासाठी दर महिन्याला ९ लाख २७ हजार रुपये खर्च होता. मात्र पिंगळे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती कल्पना चुंभळे व संचालक मंडळाने अनावश्यक होणारा खर्च कमी करत ३५ सुरक्षारक्षक कमी केले. आता त्यांच्याऐवजी समितीचे पहारेकरी हे काम पाहणार आहेत.

नाशिक बाजार समितीमध्ये माजी सभापती पिंगळे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत त्यांच्याच गटातील संचालकांनी साथ सोडली. हे संचालक चुंभळे गटात सहभागी झाले. त्यानंतर पिंगळे यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. सत्तांतर होऊन कल्पना चुंभळे या सभापतीपदी विराजमान झाल्या.

आता त्यांनी पिंगळे यांनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सभापती धडाका लावला आहे. सुरक्षेच्या नावाखाली खासगी ठेकेदाराकडून ३५ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. चुंभळे यांनी या सुरक्षारक्षकांची आवश्यकता नसल्याने कमी केले आहेत.

एका सुरक्षारक्षकाला बाजार समिती दर महिन्याला २२ हजार ५०० रुपये वेतन देत होती. तसेच बाजार समितीने देखील पहारेकऱ्यांची भरती केलेली होती. समितीचे पहारेकरी असताना खासगी सुरक्षारक्षकांची गरज नसल्याने संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या वेळी उपसभापती विनायक माळेकर, शिवाजी चुंभळे, सविता तुंगार, तानाजी करंजकर, संदीप पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT