Onion Nursery Management Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Nursery Management : सुधारित तंत्राने कांदा रोपवाटिका

Onion Cultivation : नाशिक जिल्ह्यातील धोडंबे (ता. चांदवड) येथील प्रयोगशील कांदा उत्पादक म्हणून दीपक उशीर यांची ओळख आहे. दीपक उशीर हे पूर्वी पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड करत होते.

 गोपाल हागे

Farming Management:

शेतकरी नियोजन कांदा

शेतकरी : दीपक काशिनाथ उशीर

गाव : धोडंबे, ता. चांदवड, जि. नाशिक

एकूण क्षेत्र : ८ एकर

कांदा लागवड : २ एकर

नाशिक जिल्ह्यातील धोडंबे (ता. चांदवड) येथील प्रयोगशील कांदा उत्पादक म्हणून दीपक उशीर यांची ओळख आहे. दीपक उशीर हे पूर्वी पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड करत होते. मात्र लागवडीपासून काढणीपर्यंतच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे कांद्याची गुणवत्ता, उत्पादकता यावर मोठा परिणाम होत असे. यावर मात करण्यासाठी दीपक उशीर यांनी अभ्यास करून कांदा रोपनिर्मिती, पुनर्लागवड यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब करण्यास सुरुवात केली.

यातून रोपांचे नुकसान टाळण्यासह कांदा उत्पादन वाढ साधण्यात ते यशस्वी झाले आहेत. स्वतःच्या शेतामध्ये लागवड केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कांदा रोपांची विक्री केली जाते. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केल्यामुळे दर्जेदार कांदा उत्पादन मिळते. काढणीनंतर विक्रीपूर्वी कांद्याची प्रतवारी केल्यामुळे बाजारात दरही चांगले मिळतो. कांदा लागवड क्षेत्र वाढविण्यापेक्षा कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे फायद्याचे ठरते. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे असल्याचे दीपक सांगतात.

घरगुती कांदा बियाणे उत्पादन

हंगामात बियाणे तुटवडा व दरवाढ ही समल्या दरवर्षी जाणवते. या समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी ७ ते ८ गुंठे क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात सपाट गादीवाफ्यावर डेंगळे लागवड होते. लागवड खर्च कमी करण्यासाठी कांदा बीजोत्पादनाचे नियोजन केले जाते. त्यासाठी खरीप कांद्याची काढणीपश्चात निवड पद्धतीने कांदे वापरून डेंगळे लागवड केली जाते. त्यापासून सरासरी १५ किलो बीजोत्पादन मिळते.

शास्त्रीय पद्धतीने रोपवाटिका

घरगुती बियाणे वापरून गादीवाफ्यावर कांदा रोपांची निर्मिती केली जाते. दर्जेदार रोपनिर्मितीवरच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती, वाढ व आगामी उत्पादन अवलंबून असल्याने त्यावर विशेष लक्ष दिले जाते. रोपांची मध्यम वाढ, काडी परिपक्व व निरोगी, मुळांची योग्य संख्या या अनुषंगाने रोपवाटीकेचे नियोजन केले जाते.

स्वतःकडील क्षेत्रातील कांदा लागवडीसाठी रोपे राखीव ठेवून उर्वरित रोपांची विक्री केली जाते. कांदा रोपवाटिकेसाठी काळी व हलकी, उताराची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली जाते. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास, वाफ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाते.

रोपवाटिका नियोजन

 रोपवाटिका नियोजनानुसार निवडलेल्या क्षेत्रामध्ये निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा यांचे मिश्रण करून वापर केला जातो. रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे टाळला जातो.

 गादीवाफ्यांमध्ये बियाणे टाकण्यापूर्वी बियाणांस बुरशीनाशकांची प्रक्रिया केली जाते. ट्रायकोडर्मा पाण्यात भिजवून हलक्या हाताने बियाण्यांस लावले जाते. त्यानंतर बियाणे सुकवून वाफ्यांमध्ये पेरणी केली जाते.

 साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयारी केली जाते. रोपवाटिकेसाठी साडेतीन फूट रुंद आणि लांबी शेताच्या आकारमानानुसार ठरविली जाते.

 बियाणे वाफ्यामध्ये टाकल्यानंतर पहिले सिंचन रेनपाईपने केले आते. त्यानंतर वाफसा व पावसाचा अंदाज स्थिती तपासून रेनपाइपनेच सिंचन करण्याचे नियोजन असते.

 बियाणे अंकुरल्यानंतर वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन साधारण ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात.

 रोपांचा पिवळेपणा, शेंडे मर, जमिनीतील हानिकारक बुरशी व कीड नियंत्रण करण्यासाठी शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो.

 गादी वाफ्यावर रोपे तयार केल्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होण्यास मदत मिळते.

पुनर्लागवड नियोजन

 सप्टेंबर महिन्याच्या मध्यात रोपांची पुनर्लागवड केली जाते. पुनर्लागवडीसाठी ४० ते ४५ दिवसांची रोपे निवडली जातात. लागवडीयोग्य रोपे उपटण्यापूर्वी ट्रायकोडर्माची आळवणी केली जाते.

 पांढरी मुळी वाढण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा आळवणीद्वारे वापर केला जातो.

 कांद्याची प्रतवारी व टिकवणक्षमता वाढीसाठी लागवडीपूर्वी दाणेदार गंधकाचा वापर केला जातो.

 एनपीके भरखतांचा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी गरजेनुसार मात्रेत वापर केला जातो.

 लागवड सपाट गादी वाफ्यावर केल्यामुळे पाणी बचत होते. शिवाय पावसाळ्यात कंदाची सड होत नाही.

 रोपाची काडी सशक्त, पांढऱ्या मुळ्यांचे अधिक प्रमाण व प्रतिकारक्षम रोपांची पुनर्लागवडीसाठी निवड केल्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते. शिवाय गुणवत्तापूर्ण कांदा तयार उत्पादन मिळते.

- दीपक उशीर ७५८८५१५७३३

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

- मदन व्यवहारे ९९२३५३७३९०

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT