Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC : अविश्वास ठरावानंतर संचालक परदेश दौऱ्यावर

APMC update : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे हे मनमानी करीत हुकूमशाही पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप उपसभापतिंसह १५ संचालकांनी केला.

Team Agrowon

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे हे मनमानी करीत हुकूमशाही पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप उपसभापतिंसह १५ संचालकांनी केला. संचालकांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे संचालकांचे म्हणणे आहे.

या मुद्द्यावर पिंगळे यांच्याविरोधात १८ पैकी १५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर यापैकी दहा संचालक मंगळवारी (ता. ४) सहलीसाठी परदेशी रवाना झाले आहेत. तर उर्वरित संचालक देशांतर्गत देवदर्शनाला रवाना झाल्याची चर्चा आहे.

अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाल्यानंतर मंगळवारी (ता. ११) सभा होणार आहे. त्यामुळे याच दिवशी संबंधित संचालक नाशिक शहरात दाखल होतील, असे बोलले जात आहे. पिंगळे यांच्या गटातील जवळपास ९ संचालक विरोधात गेले. त्यानंतर अविश्वास ठराव पोलिस बंदोबस्तात सोमवारी (ता. ३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दाखल करण्यात आला होता.

पिंगळे यांचे कट्टर विरोधक माजी सभापती शिवाजी चुंभळे, संचालक भास्करराव गावित, जगन्नाथ कटाळे, संचालिका कल्पना चुंभळे, सविता तुंगार हे देवदर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. तर विनायक माळेकर, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील व संपतराव सकाळे हे परदेशात गेल्याचे बोलले जात आहे.

वाद पुन्हा उफाळणार

देविदास पिंगळे व शिवाजी चुंबळे हे एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा समोर आले आहेत. एकीकडे राज्यात भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती सत्तेत आहे. नाशिक बाजार समिती वर्चस्वाखाली येण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील आहे. तर पिंगळे यांची गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीवर सत्ता आहे.

मात्र पिंगळे यांच्या मनमानीचे कारण देत त्यांच्याच गटातील संचालक विरोधात गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर चुंबळे यांनी संचालकाची मोट बांधून अविश्वास ठराव दाखल केला. सध्या चुंबळे हे भाजपमध्ये आहेत तर पिंगळे अजित पवार यांचे समर्थक आहेत. राज्यात महायुतीची सत्ता असताना मात्र घटक पक्षांच्या निमित्ताने बाजार समितीचे सत्ता कारणावरून पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT