PM Narendra Modi  Agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi Oath : तिसरे मोदीपर्व आजपासून

Prime Minister Oath Ceremony : १८ व्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केल्याने एनडीएचे नेते नरेंद्र मोदी उद्या (ता. ९) सायंकाळी सव्वासात वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Team Agrowon

New Delhi News : १८ व्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केल्याने एनडीएचे नेते नरेंद्र मोदी उद्या (ता. ९) सायंकाळी सव्वासात वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवन येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात देशातील विविध पक्षांचे नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिवाय बांगलादेश,भूतान, नेपाळ, मालदिव, श्रीलंकेच्या अध्यक्षांची आणि पंतप्रधानांची सोहळ्यात विशेष उपस्थिती असेल. नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजप आणि घटक पक्ष तेलगू देसम, जेडीयू, शिवसेना, लोकजनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार देखील शपथ घेणार आहेत. तब्बल ४० खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असा अंदाज बांधला जात आहे.

१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला आणि त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळाले . भाजप हा २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. काल ‘एनडीए’च्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर ‘एनडीए’ने केंद्रात सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे केला. यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याचे पत्र नरेंद्र मोदी यांच्या स्वाधीन केले.

शेजारील देशांच्या प्रमुखांची उपस्थिती

रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी शेजारील देशांच्या अध्यक्षांना निमंत्रित केले आहे. २०१४ मध्ये झालेल्या शपथविधीलाही शेजारील देशांच्या प्रमुखांस निमंत्रित केले होते.

शपथविधीला उपस्थित राहणाऱ्यांत श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, मालदिवचे अध्यक्ष डॉ. महंमद मुईज्जू, सेचेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शेजारील देशांची संबंध वृद्धिंगत होईल, असा दावाही करण्यात आला. यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र निमंत्रित केलेले नाही.

शपथविधीसाठीची सुरक्षा व्यवस्था

उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन परिसर व ल्युटन्स झोन परिसरात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच दिल्लीतील विमानतळावर सुद्धा ‘नो फ्लाईंग झोन’च्या संदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. तसेच ‘सीआयएसएफ’कडे शपथविधी कार्यक्रमाची सुरक्षा सोपविण्यात आली आहे.

चाळीस जणांचे मंत्रिमंडळ

नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात यावेळी पहिल्या टप्प्यात जवळपास ४० जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपला बहुमत नसल्याने एनडीएतील घटकपक्षांना अधिक संधी द्यावी लागणार आहे. यामुळे भाजपचे १८ ते २० तसेच घटक पक्षांचे तेवढेच नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. जुलै महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT