Jowar Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Crop : नांदुऱ्याची ओळख आता बनतेय ‘रब्बीसाठी ज्वारी बेल्ट’

Irrigation Facility : नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांनी आता सिंचन सुविधेचा अभाव पाहता कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी पिकाकडे रब्बीत मोर्चा वळवल्याचे चित्र सध्या पाहावयाला मिळते आहे.

Team Agrowon

Buldhana News : खरीप हंगामात कापूस उत्पादनासाठी ओळख तयार झालेल्या नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांनी आता सिंचन सुविधेचा अभाव पाहता कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी पिकाकडे रब्बीत मोर्चा वळवल्याचे चित्र सध्या पाहावयाला मिळते आहे. खरिपात कापूस व रब्बीत ज्वारी अशी नवी ओळख तयार होऊ पाहते आहे. रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीवरून हा कयास लावला जात आहे.

नांदुरा तालुक्यात जवळपास ४९ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्र आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात इतर वर्षाच्या तुलनेत उत्पादन खर्चाच्या मानाने कापूस पिकाचा खर्च जास्त व उत्पादन कमी झाला. त्यातच भावातही मंदीचे सावट असल्यामुळे केवळ साडेसोळा हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती.

इतर वर्षाच्या तुलनेत शेतकऱ्यांनी कापसाकडे काहीशी पाठ फिरवली. अगोदरच तालुक्यात सिंचन सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र तग धरून नसल्याने रब्बीत कोरडवाहू हरभरा लागवड केली जात होती. ज्यांच्याकडे थोडीफार सिंचनाची व्यवस्था आहे, ते शेतकरी गहू, कांदा, मका अशी पिके रब्बीत घेत.

सध्या ज्वारी पीक पेरणीला सुरुवात झाली असून, अगोदर पेरणी केलेल्या शेतकऱ्याचे ज्वारी पीक उगवून बहारदार झाले आहे. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात काही शेतकऱ्यांनी तालुक्यात सिंचनाच्या अभावातून ज्वारी पीक पेरले असता एकरी पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले होते. प्रतिक्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दरही मिळाला होता. त्यामुळे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात ज्वारीचा पेरा तालुक्यात वाढला आहे.

नांदुरा तालुक्यात रब्बीसाठी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना गहू व हरभरा या दोनच पिकांचा पर्याय ठेवला गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ज्वारी पेरूनही त्यांना यावर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT