Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection : नांदेड जिल्ह्यात १४ हजार वीज जोडण्या

Mahavitaran : महावितरणने नऊ महिन्यांत जिल्ह्यात १४ हजार ३५४, तर नांदेड परिमंडळात २१ हजार ६१५ नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत.

Team Agrowon

Nanded News : महावितरणने नऊ महिन्यांत जिल्ह्यात १४ हजार ३५४, तर नांदेड परिमंडळात २१ हजार ६१५ नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील ९२ हजार १०८ ग्राहकांना विविध प्रकारच्या नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.

महावितरणने ग्राहकांना तत्पर, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी वीज जोडणी अर्ज तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.

शहरी भागात २४ तासांत तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीज जोडणी देण्याचे निर्देश आहेत. ग्राहकांनी वीज जोडणीसाठी अधिकृत प्रक्रियेचा अवलंब करावा, अनधिकृत वीज वापर टाळावा, नवीन वीज जोडणीसाठी दलाल अथवा मध्यस्थाशी संपर्क साधू नये व त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

नागरिकांनी वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मंडळ कार्यालय नवीनजोडण्या

हिंगोली ३,१७७

नांदेड १४,३५४

परभणी ४,०८४

नांदेड परिमंडळ २१,६१५

मराठवाडा एकूण ९२,१०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Harvesting: भात कापणी करताना शेतकरी मेटाकुटीला

Traders Issue: खानदेशात तेंदू पत्ता व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा

Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत ७३ हजार हेक्टरवर पेरणी

Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

SCROLL FOR NEXT