
Maharashtra Electricity Bill : Maharashtra Electricity Bill : महावितरणकडून पुढील पाच वर्षांचा वीजदर ठरविण्याबाबतचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. सध्या कोळश्यावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी, आगामी काळात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर 'महावितरण'कडून भर दिला जाणार आहे. अशीही माहिती पाठक यांनी दिली.
महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "औद्योगिक ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती सुरूच राहणार आहेत. दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळजवळ २ रुपये ४० रुपये सवलत मिळणार आहे. विजेचे दर दरवर्षी ८ ते १० टक्के वाढणे अपेक्षित असते. मात्र, सौरऊर्जेमुळे पुढील ५ वर्षे विजेचे दर कमी होतील. त्यानुसार दर ९ रुपये ४५ पैसांहून ९ रुपये १४ पैसे असे दर कमी होतील. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे ५ वर्षांत १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठीचे दर ५ रुपये ८७ पैसे प्रतियुनिटपर्यंत, तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर १२ रूपये प्रतियुनिटपर्यंत कमी होतील". अशी माहिती पाठक यांनी दिली.
"महावितरण'चा ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होतो. तर इतर खर्च १५ टक्के इतर घटकांवर होतो. महावितरणला सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी २ हजार मेगावॉट वीज उपलब्ध असून, नियोजन केल्यानुसार भविष्यात त्यात वाढ होईल, साहजिकच विजेचे दर कमी करणे शक्य होईल", असे महावितरणकडून सांगण्यात आले.
नव्या प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान याबाबत १७ फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना, हरकती दाखल करता येणार आहेत. वीज दर प्रस्तावासंदर्भातील सुनावणी २५ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये होणार आहे. तसेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्येही सुनावणी होणार आहे.
'या निर्णयामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार पुढील ५ वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. याचा थेट फायदा राज्यातील करोडो ग्राहकांना होणार आहे'. अशीही माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.