Crop Survey  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Survey : नुकसानीच्या आढाव्यासाठी नणंद-भावजय शेताच्या बांधावर

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) विशेषत: मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. खासदार रक्षा खडसे व त्यांच्या नणंद तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात वादळी पाऊस झाला. त्यामुळे केळीबागांसह काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान झाले.

रक्षा खडसेंकडून आढावा

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा आदी ठिकाणी खासदार रक्षाता खडसे यांनी भाजप पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली व तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे खासदार रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन देऊन धीर दिला. अशोक कांडेलकर, विनोद पाटील, चंद्रकांत भोलाने, राजू सवळे, प्रवीण शिंपी, सोपान झाल्टे, रवी राजपूत आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT